Reliance Jio Tariff Hike | Jio ने दिला मोठा धक्का ! 899 रुपयांचा झाला 11 महिने चालणारा ‘हा’ प्लान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Reliance Jio Tariff Hike | भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) ने आपल्या यूजर्सना मागील दिवसात मोठा झटका दिला आहे. रिलायन्स जिओचा 11 महिने चालणारा प्लान आता 899 रुपयांचा झाला आहे. यापूर्वी या प्लॅनसाठी यूजर्सना 749 रुपये खर्च करावे लागत होते. हा जिओ फोन प्लान आहे. यापूर्वी कंपनी या प्लॅनवर 150 रुपयांची सूट देत होती, जी आता बंद करण्यात आली आहे. (Reliance Jio Tariff Hike)

 

899 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणारे फायदे
कंपनीचा हा प्लान 336 (28 दिवस X 12 सायकल) च्या वैधतेसह येतो. इंटरनेट वापरण्यासाठी कंपनी या प्लॅनमध्ये प्रत्येक 28 दिवसांसाठी 2 जीबी डेटा देत आहे.

त्यानुसार, प्लॅनमध्ये उपलब्ध एकूण डेटा 24 जीबी होतो. देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग देणार्‍या या प्लॅनमध्ये तुम्हाला 50 एसएमएस/ 28 दिवस मोफत मिळतात. कंपनी प्लॅनच्या सदस्यांना जिओ अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस देखील देत आहे. (Reliance Jio Tariff Hike)

 

जिओ फोनचा सर्वात स्वस्त प्लॅन
जिओ फोनचा सर्वात स्वस्त प्लॅन 75 रुपयांचा आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 23 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 0.1 जीबी मिळेल. कंपनी या प्लानमध्ये 200 एमबी अतिरिक्त डेटा देखील देत आहे. अमर्यादित कॉलिंग बेनिफिटसह येणार्‍या या प्लानमध्ये तुम्हाला 50 फ्री एसएमएस देखील मिळतील.

 

Web Title :- Reliance Jio Tariff Hike | reliance jio has raised its jiophone tariffs by 20 per cent

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा