रिलायन्स Jio चा कॉल फक्त 6 पैसे प्रति मिनीट, ग्राहकांना मिळणार अतिरिक्त डाटा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ट्राय (TRAI) च्या नवीन पॉलिसीनुसार जिओने IUC चार्ज लावायला सुरुवात केली आहे. मात्र यामुळे ग्राहकांवर कोणताही मोठा बोजा पडणार नसल्याचे कंपनीने सांगितले आहे. कारण 6 पैसे प्रती मिनिट दर आकारणीसोबतच कंपनी ग्राहकांना अतिरिक्त इंटरनेट डेटा देणार आहे. कंपनीला हा निर्णय ट्रायमुळे घ्यावा लागत असल्याचे समजते.

जिओ आपल्या ग्राहकांना मोफत कॉलिंगची सुविधा देत असल्यामुळे ट्रायला आपल्या खिशातून हजारो करोड रुपये IUC म्हणून भरावा लागत होता. दुसऱ्या कंपनीचे ग्राहक जिओ वापरणाऱ्यांना मिस कॉल देत असे आणि जिओ ग्राहक त्या कॉल धारकाला कॉलबॅक करत असे त्यामुळे IUC चार्ज हा फक्त जिओला भरावा लागत असे. मात्र एवढे असूनही जिओ ग्राहकांवर बोजा टाकत नाहीए. IUC शुल्काच्या बदल्यात कंपनी ग्राहकाला इंटरनेट डेटा देणार आहे.

जिओ ने ग्राहकांना लावला IUC चार्ज –
जिओ वरून दुसऱ्या नेटवर्कला कॉल केल्यावर हा चार्ज लागू होतो. ट्राय ने हा दर बंद करेपर्यंत हे सुरु होणार आहे. ट्राय 1 जानेवारीपासून IUC न लावण्यावर ठाम होते. एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीच्या नेटवर्कवर कॉल केल्यावर IUC चार्ज लागू होतो. जिओ ग्राहकांना फ्री कॉलिंग देत होते. त्यामुळे IUC चार्ज जिओ भरत असे यामुळे जिओ ने वर्षामध्ये 13,500 कोटी रुपये चार्ज भरला आहे. त्यामानाने दुसऱ्या कंपन्यांचे चार्जेस खूप जास्त आहेत आणि म्हणूनच त्यांचे कॉल दर खूप महाग आहेत. यामुळेच दुसऱ्या कंपनीचे ग्राहक यावर मिस कॉल देतात. दर महिन्याला जिओ वर 25 – 30 कोटी मिस कॉल येतात. त्यानंतर जिओ धारक जेव्हा कॉल करतो तेव्हा IUC चार्ज लागतो. अशा कॉलवर जिओ ग्राहकाला प्रती मिनीट 6 पैसे भरावे लागतात.

ग्राहकांवर ओझं नाही –
जिओ ने IUC चार्ज लावल्यामुळे त्याचा बोजा हा ग्राहकांवर पडणार नाही कारण IUC च्या रिचार्ज नंतर ग्राहकाला इंटरनेट डेटा मिळणार आहे. म्हणजेच दहा रुपयांच्या रिचार्जवर एक जिबी डेटा मिळणार आहे.

यावर कोणताही चार्ज नाही –
जिओ टू जिओ वरून केले जाणारे कॉल तसेच जिओ लँडलाईन कॉल आणि व्हाट्सअप कॉल यावर कोणताही अधिकच दर आकारला जाणार नाही. जोपर्यंत आऊटगोईंग कॉलचे दर झिरो असणार आहेत तोपर्यंत सिमेट्री होणार नाही असे टेलीकॉम कमिशनचे माजी सदस्य आर के मिश्रा यांनी सांगितले.

Visit : Policenama.com 

You might also like