…म्हणून Jio मोबाईलचे प्लॅन ‘महागणार’ !, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही जिओचे ग्राहक आहेत तर आता तुम्हाला मोबाईल रिचार्जसाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. लवकरच जिओचे रिचार्ज प्लॅन महाग होऊ शकतात. कंपनीने अनेक प्रोजेक्ट्समध्ये गुंतवणूक करत आहे आणि तो खर्च वसूल करण्यासाठी टॅरिफच्या किंमतीत वाढ करु शकते. जिओच्या या निर्णयाचा परिणाम एअरटेल आणि वोडाफोन – आयडिया सारख्या कंपन्या होणार नाही, परंतू यावर जिओने यावर आधिकृत माहिती दिली नाही.

जिओ का वाढवत आहे टॅरिफ प्लॅनची किंमत –

रिलायन्स जिओचा फ्री ऑफर्स आणि फ्री सब्सक्रिप्शनच्या सेवेची भारतात चांगली पकड आहे. मानले जात आहे की, महसूल प्रकारात जिओ भारतात सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी असेल. मागील काही दिवसांपूर्वी आलेल्या एका रिपोर्टनुसार ३३.१३ कोटी ग्राहकांबरोबर देशातील सर्वात मोठी दूरसंचार सेवा प्रदान करणारी कंपनी असेल.

एका रिपोर्टनुसार सप्टेंबर २०१६ मध्ये बाजारात जिओची एंट्री झाल्यानंतर इंटरनेट डाटाचा खप १० पट वाढला. तर टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत ५० टक्कांपर्यंत उतरण आली. अशात जर ग्राहक डाटा सर्विससाठी पैसे खर्च करु शकतात. तर कंपन्या देखील याचा फायदा घेण्यासाठी आपल्या प्लॅनच्या किंमती वाढवतील.

यामुळे ग्राहकांना मात्र रिचार्जच्या प्लॅनवर जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. आता या रिचार्जमध्ये किती वाढ होणार हे कंपनीने अजून स्पष्ट केलेले नाही.

आरोग्यविषयक वृत्त –