Reliance Jio च्या प्रीपेड पॅक्सवर ‘बंपर’ बेनिफिट्स, जाणून घ्या 5 बेस्ट रिचार्ज प्लान्स

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Reliance Jio ने आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या किंमतीचे वेगवेगळे प्लान आणले आहेत. या प्लानमध्ये युजर्सना कॉलिंग सोबत अन्य बेनिफिट्स देण्यात आले आहेत. तसेच जिओच्या 1.5 जीबी डेली डेटाच्या प्लानमध्ये 28 दिवसाच्या वैधतेपासून वर्षभराची वैधता दिली आहे. जाणून घ्या या खास प्लान विषयी.

जिओचा 199 रुपयांचा प्लान
जिओच्या या प्लानमध्ये 28 दिवसांची वैधता मिळते. रोज 1.5 जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये एकूण 42 जीबी डेटा ऑफर केला जातो. याशिवाय, प्लानमध्ये नॉन जिओ नंबर वर कॉलिंग साठी 1 हजार मिनिट सोबत 100 एसएमएसची रोज सुविधा दिली आहे.

जिओचा 399 रुपयांचा प्लान
या प्लानमध्ये 1.5 जीबी डेटा रोज मिळतो. 56 दिवसांच्या वैधतेसोबत मिळणाऱ्या या प्लानमध्ये एकूण 84 जीबी डेटा ऑफर केला जातो. तसेच जिओ ते जिओ वर अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस रोज मिळते.

जिओचा 555 रुपयांचा प्लान
या प्लानमध्ये 1.5 जीबी डेटा रोज मिळतो. परंतु, या प्लानमध्ये जास्त वैधता मिळते. 84 दिवसांची वैधता मिळत असून एकूण 126 जीबी डेटा युजर्संना दिला जातो.

777 रुपयांचा जिओ प्लान
जिओच्या या प्लानमध्ये 555 रुपयांच्या प्लानप्रमाणे बेनिफिट्स आणि वैधता मिळते. परंतु, या प्लानमध्ये कंपनी 5 जीबी अतिरिक्त डेटा ऑफर करते. ज्यात 84 दिवसांच्या वैधतेत एकूण 131 जीबी डेटा मिळतो. तसेच डिज्नी प्लस हॉटस्टारची एक वर्षापर्यंत व्हीआयपी मेंबरशीप दिली जाते.

2121 रुपयांचा जिओ प्लान
जिओच्या या प्लानमध्ये रोज 1.5 जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता 336 दिवसांची असून प्लानमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टारचे व्हीआयपी सब्सक्रिप्शन फ्री मिळते. याशिवाय 12 हजार नॉन जिओ मिनिट मिळते. रोज 100 एसएमएस मिळते.

You might also like