…म्हणून कोट्यावधी Inactive युजर्स असूनही ‘या’ कारणाणुळं Reliance Jio नंबर-1 !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेलिकॉम कंपन्यांना मागं टाकत रिलायन्स जिओनं पुन्हा एकदा बाजी मारली आहे. जिओ देशातील पहिली टेलिकॉम कंपनी बनली असून त्यांच्याकडे तब्बल 40 कोटी सब्सक्रायबर्स आहेत. कंपनीनं जुलैमध्ये 35.5 लाख नवीन युजर्स आपल्या नेटवर्कशी जोडले आहेत. मात्र कंपनीच्या अ‍ॅक्टीव्ह युजर्समध्ये 8.5 कोटींहून अधिक युजर्सची कमी आली आहे. अशात जुलैमध्ये टेलिकॉम इंडस्ट्रीला 35 लाख युजर्सचा फायदा झाला आहे. ऑनलाईन चॅनल्स उघडल्यानंतर आणि इकॉनॉमी वेग पकडण्यासाठी देशात सब्सक्रायबर्सची संख्या वाढून 114.4 कोटी झाली आहे.

जून 2020 मध्ये भारती टेलिकॉम सब्सक्रायबर्समध्ये 32 लाखांनी कमी झाली होती. ट्रायच्या लेटेस्ट डेटाच्या माहितीनुसार, रिलायन्स जिओकडे सर्वात जास्त सब्सक्रायबर्स असले तरी इनअॅक्टीव्ह सब्सक्रायबर्समध्येही हे एअरटेल आणि वोडाफोनच्या पुढं आहे. जिओच्या अॅक्टीव्ह युजर्समध्ये 8.78 कोटींची कमी आली आहे. तर एअरटेलच्या इनअॅक्टीव्ह युजर्सची संख्या 95 लाख आणि वोडाफोन-आयडिच्या इनअ‍ॅक्टीव्ह युजर्सची संख्या 3.21 कोटी आहे.

…म्हणून काहींनी जिओ वापरणं बंद केलं

रेटींग एजन्सी फिचचे सीनियर डायरेक्टर नितीन सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार जिओच्या इनअॅक्टीव्ह युजर्समध्ये लॉकडाऊनमुळं अन्य शहरातील मायग्रंट आहेत. त्यांनी आता जिओ नंबर वापरणं बंद केलं आहे. जुलैच्या शेवटी जिओची एकूण संख्या 40.08 कोटी आहे. एअरटेलनं जुलैमध्ये 32.6 लाख वायरलेस सब्सक्रायबर्स अ‍ॅड केले आहेत. तसंच एअरटेलच्या एकूण युजर्सची संख्याही 31.99 कोटी राहिली आहे. अ‍ॅक्टीव्ह युजर्स 97 टक्के आहे.

वोडाफोन-आयडिया कंपनीच्या अडचणीत वाढ

वोडाफोन-आयडिया कंपनीच्या अडचणीत वाढ होत आहे. जुलैमध्ये वोडाफोन-आयडियाच्या युजर्सची संख्या 37.2 लाखानं कमी झाली आहे. कंपनीच्या युजर्सची संख्या कमी होऊन 30.13 कोटी झाली आहे. यात 89.33 टक्के अ‍ॅक्टीव्ह युजर्स आहेत. अ‍ॅक्टीव्ह युजर्सला ट्रॅक करण्यासाठी VLR(विझिटर लोकेशन रजिस्टर) चा वापर केला जातो. हे त्या युजर्सला टेंपररी रजिस्टर होतात. हे एका जागेतून दुसऱ्या जागेवर जातात. जर कोणताही सब्सक्रायबर अ‍ॅक्टीव्ह स्टेजमध्ये असतो तर तो कॉलिंग आणि एसएमएस सर्व्हीस वापरतो. या आधारावर अ‍ॅक्टीव्ह युजर्स आणि इनअ‍ॅक्टीव्ह युजर्सची ओळख पटते.