तुमची गाडी देखील बनू शकते ‘कनेक्टेड’ कार, Jio नं सादर केली नवी ‘टेक्नॉलॉजी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Auto Expo 2020 सुरु झाला आहे. भारतीय टेलिकॉम कंपनी Reliance Jio ने देखील यात सहभाग घेतला आहे. यात कंपनीने Advanced Driver Assistant System सादर केली. रिलायन्स जिओकडून सांगण्यात आले की कंपनीद्वारे लॉन्च करण्यात आलेल्या कार सोल्यूशनद्वारे तुम्हाला हे देखील सांगण्यात येईल की तुमची ड्रायविंग चांगली आहे की वाईट. यासाठी डॅशकॅमची मदत घेऊन हे अ‍ॅनलिसिस केले जाईल.

रिलायन्स जिओने सांगितले की वाहन चालवताना रस्त्यावर काही धोका असेल तर तुम्हाला माहिती देखील देण्यात येईल. Reliance Jio च्या OBD डिवाइसला 2013 नंतर तयार करण्यात आलेल्या कारमध्ये कनेक्ट करता येईल.

Reliance Jio ने ऑनबोर्ड डायग्नोस्टिक कार कनेक्ट नावाचे एक डिवाइस सादर केले जाईल. हे कारमध्ये सहज फिट करता येईल. यात सिम लावण्यात आले तर कारमध्ये वायफाय देखील सुरु करता येईल. याला 8 पेक्षा जास्त डिवाइस कनेक्ट करता येतील. हे कारच्या वेगवेगळ्या सेंसरला कनेक्ट करता येईल.
याद्वारे कारमध्ये होणाऱ्या विविध गतिविधींकडे लक्ष देता येईल. विशेष म्हणजे ही माहीती स्मार्टफोनमध्ये देखील पाहू शकतात. कारमध्ये किती इंधन आहे, डोर ओपन आहे की नाही याची सर्व माहिती मोबाइलवर मिळेल.

Reliance Jio ने घोषणा केली आहे की आता कारसाठी देखील ई – सिम जारी करण्यात येईल. ई-सिम शिवाय ARAI सर्टिफाइड ट्रैकर्स देखील लॉन्च केले जाईल. या डिवाइसअंतर्गत वाहनाची तपासणी तुम्ही स्वता करु शकतात ज्याचा रिपोर्ट देखील तुम्हाला मिळेल.

Auto Expo 2020 में Reliance Jio ने एक एक्सपिरीयन्स जोन्स तयार केला आहे, जेथे कंपनी कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीचे डेमोंस्ट्रेशन देत आहे. लोकेशन, सेफ्टी, इन्फोटेमेंटपासून आणखी देखील माहिती या डिवाइसद्वारे मिळेल.

कनेक्टेड कार भारतात सध्या पॉप्युलर आहे. MG Hector नंतर अनेक कंपन्यांनी कनेक्डेट फिचर्ससह आपल्या गाड्या सादर केल्या आहेत. रिलायन्स जिओच्या या तंत्रज्ञानाची चाचणी मुंबईतील कॅंपसमध्ये सुरु आहे.