फायद्याची गोष्ट ! सर्वात स्वस्त प्लॅन्, 5 रूपयांत ‘कॉलिंग’ अन् ‘डेटा’ची मजा

दिल्ली, पोलिसनामा ऑनलाईन – टेलिकॉम कंपन्यांची आपापसात जोरदार स्पर्धा सध्या पाहायला मिळत आहे. याचेच उदाहरण म्हणजे या टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी रोज नवनवीन ऑफर्स घेऊन येत आहेत. या प्लानमध्ये दररोज ५ रुपयांच्या बदल्यात २८ दिवसांपर्यंत वैधता आहे. यात डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात येत आहे.

एअरटेल ची खास ऑफर – १४९ मध्ये २८ दिवसांच्या प्लॅनची वैधता.

एअरटेल कपंनीने आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी खास प्लॅन आणला आहे या प्लॅन मध्ये दिवसाला साडेपाच रुपयांमध्ये ३०० एसएमएस फ्री त्याचबरोबर अनलिमिटेड कॉलिंग, या प्लॅन मध्ये २ GB देटा तसेच एरटेल एक्सट्रीम आणि विंक मुझिकचे फ्री स्बक्रिप्शन देण्यात आले आहे , तसेच १७९ च्या प्लॅन मध्ये २८ दिवसांच्या वैद्यते बरोबर २ लाखांचा लाईफ इन्शुरन्स फ्री देण्यात आला आहे.

व्होडाफोन –

१४९ रुपयांमध्ये २८ दिवसांची वैद्यता देण्यात आली आहे म्हणजेच, दिवसाचा खर्च साडेपाच रुपये आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग बरोबर २ GB डेटा तसेच व्हेंडाफोन प्ले आणि जी ५ चे फ्री स्बक्रिप्शन दिले जाते.

रिलायन्स जिओ – १२९ रुपयांचा प्लॅन , २८ दिवसांची वैद्यता, १४९ रुपयांमध्ये २४ दिवस वैद्यता , २४ जीबी देता

रिलायन्स जिओने देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास ऑफर्स आणल्या आहेत. १२९ रुपयांच्या प्लॅन मध्ये २८ दिवसांच्या वैध्यतेबरोबर ३०० फ्री एएमएस सह जिओ टू जिओ फ्री कॉलिंग , तसेच जिओ टू इतर कॉल्स साठी १ हजार मिनिट्स त्याचबरोबर जिओ अ‍ॅपचे फ्री ऍक्सेस देण्यात आले आहे.

जिओचा १४९ रुपयांचा हा प्लान असून याची वैधता २४ दिवसांची आहे. या प्लानमध्ये १ जीबी प्रमाणे एकूण २४ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये जिओ ते जिओ फ्री कॉलिंग मिळते. तर अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी या प्लानमध्ये ३०० मिनिट दिले जाते.