Jio-Vodafone पेक्षा Airtel चे प्लॅन्स ‘भन्नाट’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वच टेल्कॉम कंपन्यांनी आपले डेटा प्लॅन्सची किंमत वाढवली आहे. पण तुम्ही जर कंपेअर करून रिचार्ज करीत असाल तर जिओ आणि व्होडाफोन पेक्षा लय भारी डेटा प्लॅन्स एअरटेलने आणले आहेत. एअरटेलने आपले आकर्षक प्रीपेड प्लान लाँच केले आहेत. विशेष म्हणजे एअरटेलच्या दोन प्लानमध्ये युजर्संना लाइफ इन्श्यूरन्स देत आहेत. युजर्संना ४ लाखांपर्यंत लाइफ इन्शूरन्स मिळत आहे. एअरटेलचा आणखी एक ३५० रुपयांचा प्लान आहे. जो १२९ रुपयांचा अमेझॉन प्राइम सब्सक्रिप्शन देत आहे.

१७९ रुपयांचा प्लान

–एअरटेलचा १७९ रुपयांचा प्लान
–प्लानची वैधता २८ दिवस इतकी आहे.
–या प्लानमध्ये ३०० फ्री एसएमएस सह महिनाभर २ जीबी डेटा दिला जात आहे.
–युजर्संना देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येऊ शकतो.
–या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात भारती एएक्सए लाइफकडून २ लाख रुपयांपर्यंत लाइफ इन्शूरन्स ऑफर मिळत आहे.
–तसेच एअरटेल एक्सट्रिम अँप आणि म्युझिकचे सब्सक्रिप्शन फ्री दिले जात आहे.

२७९ रुपयांचा प्लॅन

–एअरटेलचा २७९ रुपयांचा प्लान
–वैधता २८ दिवस आहे.
–या प्लानमध्ये युजर्संना दररोज १.५ जीबी डेटा ऑफर , १०० फ्री एसएमएस दिले जात आहे.
–अनलिमिटेड कॉलिंग दिली जात आहे.
–प्लानच्या सब्सक्राइबर्संना एचडीएफसी लाइफकडून ४ लाख रुपयांपर्यंतचा लाइफ इन्शूरन्स दिला जात आहे.
–प्लानमध्ये एअरटेल अँप प्रीमियम,विंक म्युझिकचे फ्री सब्सक्रिप्शन सह फ्री हेलोट्यून्स दिला जात आहे.
–या प्लानअंतर्गत सब्सक्राइबर्सला फास्टटॅग खरेदी केल्यानंतर १५० रुपयाचे डिस्काउंट दिले जात आहे.

३४९ रुपयांचा प्लॅन

–एअरटेलचा ३४९ रुपयांचा प्लानची वैधता २८ दिवस आहे.
–या प्लानमध्ये १२९ रुपये किंमतीचा अमेझॉन प्राइमचे सब्सक्रिप्शन मिळते.
–या प्लानमध्ये दररोज १०० फ्री एसएमएस आणि २ जीबी डेटा दिला जातो.
–कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंग दिली जात आहे.
–एअरटेल देत असलेले फायदे रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन देत नाही.