फायद्याची गोष्ट ! दररोज 2GB डेटा आणि फ्री कॉलिंग, 250 पेक्षा कमी किंमतीत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेलिकॉम कंपन्यांकडून ग्राहकांना आकार्षीत करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन आणले जात आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना कमी किंमतीमध्ये जास्त बेनिफिट्स ऑफर केले जात आहे. या प्लॅनला यूजर्सकडून देखील पसंती मिळत आहे. रिलायन्स जिओ शिवाय एअरटेल आणि व्होडाफोन यांच्याकडे ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी अनेक प्लान आहेत. कमी खर्चात जास्त फायदा देणारे हे प्लान आहेत. 250 रुपयापेक्षा कमी किंमतीत जास्त डेटा, फ्री कॉलिंग सोबतच अतिरिक्त बेनिफिट्स दिले जात आहेत.

एअरटेलचा 219 रुपयाचा प्लॅन
एअरटेलच्या या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता देण्यात येत आहे. तसेच 1 जीबी डेटा आणि 100 एसएमएस फ्री मिळतात. प्लानमध्ये देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. प्लानमध्ये मिळणाऱ्या अन्य फायद्यात ग्राहकाला एअरटेल एक्स्ट्रीम आणि विंक म्यूझिकचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

एअरटेलचा 249 रुपयाचा प्लॅन
या प्लानमध्ये तुम्हाला 1.5 जीबी डेटा आणि 100 एसएमएस तसेच अनलिमिटेड कॉलिंग मिळते. या प्लानची वैधता 28 दिवसांची आहे. प्लॅनमध्ये एअरटेल एक्स्ट्रीम आणि विंक म्यूझिकचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. त्याचसोबत फास्ट टॅग खरेदीवर 150 रुपयांचा कॅशबॅक ऑफर देण्यात येत आहे.

व्होडाफोनचा 219 रुपयाचा प्लॅन
या प्लानची वैधता 28 दिवसांची असून दररोज 1जीबी डेटा मिळतो. तसेच 2 जीबी अतिरिक्त डेटा दिला जातो. या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग मिळते. प्लानमध्ये व्होडाफोन प्ले आणी झी 5 चे सब्सक्रिप्शन मिळते. तसेच रोज 100 फ्री एसएमएस ऑफर केले जाते.

व्होडाफोनचा 249 रुपयाचा प्लॅन
या प्लानची वैधता 28 दिवसांची असून दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग मिळते. प्लानमध्ये व्होडाफोन प्ले आणी झी 5 चे सब्सक्रिप्शन मिळते. तसेच रोज 100 फ्री एसएमएस ऑफर केले जाते.

रिलायन्स जिओचा 199 रुपयाचा प्लॅन
या प्लानची वैधता 28 दिवसांची असून दररोज 1.5जीबी प्रमाणे एकूण 42जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये जिओ नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग मिळते. दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी या प्लानमध्ये 100 मिनिट्स दिले जातात. तसेच रोज 100 फ्री एसएमएस ऑफर केले जाते. जिओ अ‍ॅप्सचे फ्री अ‍ॅक्सेस दिले जाते.

रिलायन्स जिओचा 249 रुपयाचा प्लॅन
या प्लानची वैधता 28 दिवसांची असून दररोज 2जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये जिओ नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग मिळते. दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी या प्लानमध्ये 1 हजार नॉन जिओ मिनिट्स दिले जातात. तसेच रोज 100 फ्री एसएमएस फ्री दिले जातातय. जिओ अ‍ॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.