Reliance Jio चे ‘हे’ खास रिचार्ज प्लॅन; दररोज 2 GB data सह मिळणार इतर फायदे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील एक प्रसिद्ध आणि नामाकिंत दूरसंचार कंपनी असलेली रिलायन्स जिओने (Reliance Jio) अनेक वेळा ग्राहकांसाठी एक खास योजना अथवा ऑफर आणत असते. आताही Reliance Jio ने एक ग्राहकांसाठी नवा प्लान आणला आहे. तर ज्या ग्राहकांना जास्त Data ची गरज आहे त्या ग्राहकांसाठी कंपनीने आता रोज 2 GB data देणारे वेगवेगळे प्लान आणले आहेत.

२४९ चा रिचार्ज –
Reliance Jio चा हा प्लान २५० रूपयांपेक्षाही कमी दरात देण्यात येणार आहे. यामध्ये Calling आणि SMS चा देखील लाभ मिळतो. या प्लानची किंमत २४९ रूपये इतकी आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता देण्यात येणार आहे. याचबरोबर दररोज 2 GB प्रमाणे 56 GB dataमिळतो. तसेच, ग्राहकांना सर्व नेटवर्कवर Unlimited calling आणि दररोज 100 SMS देखील देण्यात येणार आहेत. तसेच, याशिवाय JioTV, JioCinema आणि JioSecurity सारख्या अ‍ॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शन सुद्धा देण्यात येणार आहे.

४४४ चा रिचार्ज –
Reliance Jio चा ४४४ रुपयांचा प्लान दुप्पट वैधतेसह येणार आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना ५६ दिवसांची वैधता आणि दररोज 2 GB याप्रमाणे 112 GB data देण्यात येतो. याव्यतिरिक्त या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर Unlimited calling आणि रोज 100 SMS देण्यात येतात. याचबरोबर JioTV, JioCinema, JioSecurity सारख्या अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही मिळणार आहे.

५९९ चा रिचार्ज –
Reliance Jio चा ५९९ रूपयांच्या प्लानमध्ये ८४ दिवसांची वैधता मिळते. याचबरोबर यात दररोज 2 GB data प्रमाणे 168 GB data मिळणार आहे. या प्लानमध्ये Unlimited calling, आणि रोज 100 SMS तसेच, JioTV, JioCinema आणि JioSecurity सारख्या अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शन सुद्धा मिळणार आहे.