Jio ची भन्नाट ऑफर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून रिलायन्स जिओने एक जबरदस्त ऑफर आणली आहे. या ऑफरच्या माध्यमातून २९९९ रुपयांचा JioPhone २ फोन केवळ १४१ रुपयांच्या EMI वर खरेदी करता येणार आहे. कंपनीने हा फोन २०१८ मध्ये लाँच केला होता.

रिलायन्सने २०१७ साली आपला पहिला फिचरफोन जिओफोन (JioPhone) बाजारात आणला होता. JioPhone २ ची किंमत २९९९ रुपये असून या फोनला कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुन १४१ रुपयांच्या ईएमआय मार्फत खरेदी करता येईल. या फोनमध्ये २.४ इंचाचा डिस्प्ले, २००० एमएएचची बॅटरी, ४ जी, क्वार्टी की पॅड आहे. तसेच ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी इंटर्नल स्टोरेज देण्यात आलं आहे. हे स्टोरेज मेमरी कार्डद्वारे १२८ जीबी पर्यंत वाढवता येईल.

कंपनीने JioPhone २ मध्ये पुढे ०.३ मेगा पिक्सलचा कॅमेरा तर मागे २ मेगा पिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. त्याशिवाय फोनमध्ये वाय फाय, जीपीएस आणि एनएफसीसारख्या सेवा दिल्या आहेत. तसेच फोनमध्ये व्हाट्सॲप, युट्युब, फेसबुक आणि गुगल असिस्टंट चा वापर करता येणार आहे.

रिलायन्स जीओचा JioPhone ५ येतोय

लवकरच कंपनी JioPhone ५ लाँच करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या फोनची किंमत ५०० रुपयांपेक्षा कमी असेल. काही दिवसांपूर्वीच या फोनची फिचर लीक झालेली. त्यामध्ये JioPhone २ सारखेच KAI ओएस मिळेल. दरम्यान, कंपनीने अद्यापही फोनची लाँचिंग तारीख जाहीर केली नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like