‘या’ सर्व रिलायन्स Jio च्या ग्राहकांना आता देखील मिळणार फ्री कॉलिंग सुविधा, कंपनीनं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जिओने नुकतेत जिओ सोडून इतर सर्व नेटवर्कवर कॉलिंगसाठी 6 पैसे प्रति मिनिट दराने शुल्क वसूल करण्याची घोषणा केली होती. कंपनीने हे देखील स्पष्ट केले होते की जिओवरुन जिओ कॉलिंग फ्री असेल. आता कंपनीने एक नवी घोषणा केली आहे, ज्यात स्पष्ट करण्यात आले की ज्या यूजर्सने 9 ऑक्टोबरपू्र्वी रिचार्ज केले आहे त्यांंच्या नेटवर्कवर सर्व कॉलिंग फ्री असेल.

9 ऑक्टोबरपू्र्वी रिचार्ज –
ही माहिती कंपनीने ट्विट करत दिली. कंपनीच्या मते जर युजरने 9 ऑक्टोबरपूर्वी आपल्या मोबाइल नंबरवर कोणत्याही प्लॅनने रिचार्ज केले असेल तर ते पहिल्या प्रमाणेच कोणत्याही नंबरवर फ्री कॉलिंग करु शकतील. कंपनीने सांगितले की यूजर्सला जिओ सोडून वोडाफोन आयडिया, एअरटेल या नेटवर्कवर कॉलिंग केल्यास त्यांना 6 पैसे प्रति मिनिट शुल्क द्यावे लागेल. याची भरपाई म्हणून जिओने कॉलिंगवर खर्च होणाऱ्या मुल्याचा इंटरनेट डाटा ग्राहकांना देणार असल्याचे सांगितले आहे.

जिओने नवे IUC प्लॅन पहिल्यांदाच निश्चित केले आहे. जिओने सादर केलेला टॉप अप प्लॅनमध्ये सर्वात पहिला टॅरिफ वाउचर 10 रुपयांचा आहे, ज्यातून ग्राहकाला नॉन जिओ कॉलिंगसाठी एकूण 124 मिनिट देण्यात येईल आणि 1 जीबी अधिक डाटा देण्यात येईल. यानंतरचे वाउचर 20 रुपयांचे असेल, ज्यात 249 मिनिटच्या कॉलिंग बरोबर 2 जीबी डाटा देण्यात येईल.

50 रुपयांच्या वाउचरमध्ये 656 मिनिट आणि 5 जीबी डाटा देण्यात येईल. 100 रुपयांत 1362 मिनिट आणि 10 जीबी डाटा फ्री देण्यात येईल. हे IUC शुल्क 1 जानेवारी 2020 पर्यंत रद्द करण्यात येऊ शकते.

 

visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like