भारतात मुकेश अंबानींच्या Jio ला टक्कर देणार एलन मस्क यांची ‘ही’ कंपनी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात टेलिकॉम क्षेत्रात उतरल्यानंतर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या Reliance Jio ने आधी कार्यरत असलेल्या टेलिकॉम कंपन्यांवर मात करीत नंबर वन स्थान पटकावले आहे. जिओला टक्कर देण्यात भारतीय कंपन्या कमी पडल्या होत्या. पण आता एलन मस्क यांची कंपनी भारतात येत असल्याने जिओ पुढे मोठे आव्हान उभे टाकणार आहे.

काही दिवसांपूर्वी ॲमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस यांना मागे टाकून अव्वल स्थानावर पोहचलेल्या एलन मस्क लीगमधून बाजुला होऊन बिझनेस करण्यासाठी ओळखले जातात. आता एलन मस्क यांच्यामुळे भारतातील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अडचणी वाढणार आहेत. एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सने देशात व्यापार करण्यासाठी परवानगी मागितली आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये देशात TRAI ने ब्रॉडबँड कनेक्टिविटीला जास्त प्रोत्साहन देण्यासाठी एक कन्सल्टेशन पेपर रिलीज केला आहे. SpaceX कंपनीची व्हाइस प्रेसिडेंट ऑफ सॅटेलाइट गव्हर्मेंट अफेयर्स Patricia Cooper ने सांगितले की, त्यांच्या प्रोजेक्टमुळे देशात जबरदस्त नेटवर्क कनेक्टिविटी मिळणार आहे. तसेच कंपनीने स्टार लिंक प्रोजेक्ट अंतर्गत अंतराळात 12 हजार नेटवर्क सॅटेलाइट पाठवण्याची योजना बनवली आहे. यामुळे भारतीयांना जबरदस्त कनेक्टिविटी मिळण्यास मदत होणार आहे.

SpaceX चे स्टारलिंक प्रोजेक्ट इन-फ्लाइट इंटरनेट आणि मॅरिटाइम सुविधा उपलब्ध करणार आहे. या अंतर्गत चीन आणि भारतात काम करणार आहे. या दोन्ही देशात मोठी बाजारपेठ आहे. गेल्या काही महिन्यांपासून कंपनी फलकन 9 रॉकेट्स स्टारलिंक उपग्रह पाठवण्याचे काम करत आहे. यासाठी 60 सॅटेलाइटला एकत्र पाठवले जात आहे. जर एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्स च्या स्टारलिंग प्रोजेक्टची सुरुवात देशात सुरू झाली. तर याचे सर्वात जास्त आव्हान मुकेश अंबानी यांना मिळणार आहे.