Jio मुळे बदलणार शॉपिंगचा ‘अंदाज’, ‘ऑनलाइन’ घेता येणार कपड्यांचं ‘ट्रायल’ ; ‘कलर’च्या चॉईसचं ‘ऑपशन’ देखील, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लवकरच तुमच्या कपडे खरेदी करण्याची पद्धत बदलली जाणार आहे. यासाठी रिलायन्स जिओने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार नवे डिवायस आणले आहे. हे नवे डिवाइस आहे MR हेडसेट. यामाध्यमातून ग्राहक थ्रीडी पद्धतीने ३६० डिग्री पाहून ऑनलाइन आपल्या पसंतीचे कपडे खरेदी करु शकतात.

रिलायन्सच्या AGM मध्ये आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि मुकेश अंबानी ने ऑनलाइन खरेदीचा डेमो दिला. यामाध्यमातून ऑनलाइन खरेदी करणे सहज शक्य होणार आहे. यासाठी कंपनी लवकरच जिओ हॉलोबोर्ड डिवायस लॉन्च करणार आहे. यात असलेल्या थ्रीडी तंत्रज्ञानामुळे ग्राहक आपल्या पसंतीचे कपडे खरेदी करु शकतील. आकाश अंबानी यांनी याचा डेमो दाखवत MR हेडसेट डिवाइस लवकरच बाजारात दाखल होईल असे सांगितले आहे.

हे डिवाइस स्वस्तात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याच माध्यमातून हॉलोबोर्ड वर जिओ सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या स्क्रीनवरील सिनेमे आणि पसंतीचे कार्यक्रम पाहता येतील.

जिओ फायबर सर्विस होणार ५ सप्टेंबरपासून सुरु
जिओ फायबर सेवा ५ सप्टेंबरपासून ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात येईल. याचे प्लॅन १०० Mbps पासून सुरु होतील. हा स्पीड बेसिक प्लॅनसाठी असेल. प्लॅननुसार हा स्पीड १ Gbps जाईल. यात सर्व वाइस कॉल फ्री असणार आहे. जिओ फायबरचे प्लॅन ७०० रुपयांपासून सुरु होईल.

आरोग्यविषयक वृत्त