खुशखबर ! आता घरबसल्या करू शकता चार धाम मंदिराची ‘आरती’, Jio लवकर सुरू करणार ‘थेट प्रेक्षपण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ लवकरच घरी बसून चार धाम मंदिरांचे दर्शन घडवणार आहे. रिलायन्स जिओ लवकरच उत्तराखंडमध्ये असलेल्या चारधामसह अनेक प्रमुख मंदिरांमध्ये होणाऱ्या ‘आरती’ चे थेट प्रक्षेपण करणार आहे. याचा विशेषत: अशा भक्तांना फायदा होईल जे काही कारणास्तव या मंदिरांना भेट देऊ शकत नाहीत. यासाठी जिओ लवकरच डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करुन तो उत्तराखंड सरकारला उपलब्ध करुन देईल. यासह बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री यांच्यासह धार्मिक स्थळांचे दर्शन केले जाऊ शकेल.

चार धाम यात्रेचे होणार थेट प्रसारण – दरवर्षी लाखो भाविक उत्तराखंडमध्ये येतात, परंतु असे काही लोक आहेत ज्यांची श्रद्धा असूनही कोणत्या तरी कारणास्तव येथे येऊ शकत नाही. अशा भाविकांसाठी राज्य सरकार जिओच्या मदतीने ऑनलाईन व्यवस्था करणार आहे. 2018 मध्ये उत्तराखंड इन्व्हेस्टर्स समिटपूर्वी मुंबईत झालेल्या रोड शो दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत डिजिटल उत्तराखंडसाठी नेट कनेक्टिव्हिटीमध्ये सहकार्याचा प्रस्ताव दिला.

रिलायन्स जिओने फायबर कनेक्टिव्हिटीवर काम केले असून ते जवळपास 89 टक्के पूर्ण झाले आहे. यासाठी मुख्यमंत्री रावत यांनी कृतज्ञता व्यक्त करत म्हंटले कि, “जगभरातील लोक उत्तराखंडच्या अध्यात्मातून चारधाम व इतर प्रमुख मंदिरांचे थेट दर्शन घेऊन परिचित होतील. शारीरिक आरोग्य किंवा इतर कारणांमुळे येऊ न शकणारे भाविक चारधाम दर्शनाचा लाभ घेण्यास सक्षम असतील.

You might also like