‘वायू’ वादळाने पुन्हा बदलली दिशा ; गुजरातचा धोका झाला कमी

अहमदाबाद :वृत्तसंस्था – वायू चक्रीवादळाच्या बाबतीत गुजरातला थोडाफार दिलासा मिळाला आहे. वायू चक्रीवादळाची दिशा बदलल्याने आता गुजरातच्या दक्षिण समुद्र किनाऱ्याला समांतर अंतराने प्रवास सुरू ठेवला आहे. त्यामुळे वायू चक्रीवादळ थेट गुजरातला धडकणार नसलं तरी त्याचा परिणाम समुद्र किनाऱ्यालगतच्या परिसरांना बसणार आहे. भारतीय हवामान खात्याने या बाबतची माहिती दिली आहे.

https://twitter.com/ANI/status/1139016905656692736

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ पोरबंदर आणि द्वारका किनाऱ्यापट्टीच्या भागातून माघारी वळणार आहे. चक्रीवादळ माघारी फिरताना गुजरातच्या किनारपट्टी भागात त्याचा परिणाम जाणवणार असून मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

गुजरातमध्ये खबरदारी म्हणून जवळपास ३ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून शाळांनाही दोन दिवस सुट्टी देण्यात आली आहे. गुजरात प्रशासनानं विमान आणि ट्रेनही रद्द केल्या आहेत. वायू वादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरात प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. वायूचा थेट धोका टळला असला तरी प्रशासन सुरक्षेसाठी तैनात ठेवणार आहे अशी माहिती गुजरातच्या महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव पंकज कुमार यांनी दिली.

आरोग्यविषयक वृत्त

सावधान ! ‘या’ लोकांना ‘आइस टी’चे सेवन पडू शकते महागात

*मेकअप रिमूव्ह करुन झोपा नाहीतर त्वचेला होईल नुकसान

जरा जपून, ‘या’ कारणांमुळे होऊ शकते केस गळती

‘हा’ आहे जपानी सर्वात स्वस्त उपाय ज्याने तुम्ही ठेवू शकतात तुमचे वजन नियंत्रणात

You might also like