Nasal स्प्रे आणि ORS च्या मिश्रणाप्रमाणे घेऊ शकता कोरोनाची व्हॅक्सीन ! सरकारने केली तयारी

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस महामारीविरूद्धच्या मोठ्या लढाईनंतर जगभरात कोरोना व्हॅक्सीनची लोक अतुरतेने वाट पहात आहेत. अमेरिका, रशिया आणि ब्रिटनमध्ये कोरोना व्हॅक्सीनला इमर्जन्सी मंजूरी मिळाली असून तिथे व्हॅक्सीनेशन सुरू झाले आहे. तर भारतात सुद्धा 3 व्हॅक्सीन उत्पादक कंपन्यांनी इमर्जन्सी मंजूरीसाठी अर्ज केला आहे. अपेक्षा आहे की, 2021 च्या सुरूवातीला भारतात सुद्धा लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू होईल.

जगभरात तयार होत आहेत 300 पेक्षा जास्त व्हॅक्सीन
सध्या विविध देशात 300 पेक्षा जास्त व्हॅक्सीन तयार होत आहेत. यापैकी बहुतांश व्हॅक्सीन इंजेक्शनद्वारे दिल्या जाणार्‍या आहेत. मात्र, काही व्हॅक्सीन अशाही तयार केल्या जात आहेत, ज्या नाक आणि तोंडावाटे शरीरात टाकल्या जाऊ शकतात. कोरोना बहुतांश शरीरात नाकावाटे प्रवेश करतो. यासाठी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ज्या पेशींशी पॅथोजेनचा सामना होईल, त्याच पेशींमध्ये इम्युन रिस्पॉन्स ट्रिगर करणे परिणामकारक ठरू शकते, जे नोजल स्पे करू शकते. भारतात हैद्राबाद येथील भारत बायोटेक आणि पुण्याच्या सीरम इन्स्टीट्यूटने सुद्धा नोजल व्हॅक्सीन तयार केली आहे, जिच्या पहिल्या टप्प्यातील ट्रायल पुढील महिना जानेवारी सुरू होईल.

नाक आणि तोंडाच्या व्हॅक्सीनवर काम सुरू
इंट्रा-मस्क्युलर आणि नोजल व्हॅक्सीनसोबतच जगात काही ठिकाणी ओरल व्हॅक्सीनवर सुद्धा काम सुरू आहे. तज्ज्ञांचे मत आहे की, अशा व्हॅक्सीनच्या रिअ‍ॅक्शनचे चान्स कमी होतात. सोबतच लॉजिस्टिक कॉस्ट सुद्धा कमी होते. ज्यामुळे व्हॅक्सीनची कॉस्ट कमी होते. ओरल व्हॅक्सीन कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवली जाऊ शकते. सध्या ओरल व्हॅक्सीनच्या पहिल्या टप्प्याची चाचणी सुरू झाली आहे. ज्यामध्ये अमेरिकेची इम्युनिटी बायो आणि ऑस्ट्रेलियाची बर्नबेबी बायोटेक प्रामुख्याने सुरूवातीच्या टप्पयातील चाचणी करत आहेत.

मुले आणि ज्येष्ठांना मिळणार नोजल व्हॅक्सीन
दिल्ली येथील एम्सचे डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी मेडिसिनचे प्रोफेसर डॉ. पुनीत मिश्रा यांचे म्हणणे आहे की, देशातील एका मोठ्या लोकसंख्येत मुले आणि ज्येष्ठ आहेत, त्यांना इंजेक्शन घेण्यास भिती वाटते. अशावेळी अशाप्रकारच्या नोजल व्हॅक्सीनची मोठ्या प्रमाणात निर्मिती करणे आणि लसीकरण करणे सोपे होते. सामान्यपणे इंजेक्शनची व्हॅक्सीन कमजोर म्यूकोसल रिस्पॉन्स ट्रिगर करते, कारण त्यांना इतर अवयवांच्या इम्युन सेल्सला इन्फेक्शनच्या जागेवर आणावे लागते. सामान्य व्हॅक्सीनच्या तुलनेत नोजल व्हॅक्सीन मोठ्याप्रमाणात बनवणे आणि वितरित करणे सोपे आहे. सोबतच नोजल ओरल व्हॅक्सीनची ट्रायल सुरूवातीच्या काळात आहे. अजून यामध्ये खुप काम करण्याची आवश्यकता आहे.

जर भारतासह अनेक देशांमध्ये नोजल आणि ओरल व्हॅक्सीनची ट्रायल यशस्वी झाली आणि परिणामकारक ठरली तर तो दिवस दूर नाही जेव्हा लोक कोरोनाच्या व्हॅक्सीनचा वापर नोजल स्प्रे आणि ओआरएसच्या मिश्रणा प्रमाणे करू शकतील.