Gold Rates Today : अक्षय तृतीयेपूर्वी सोने झाले ‘स्वस्त’, चांदीही ‘घसरली’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात सातत्याने चढउतार दिसून येत आहे. अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या अक्षय तृतीयेपूर्वी बुधवारी (दि. 12) सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. एमसीएक्सवर आज सोन्याच्या दरात 0.18 टक्क्यांची घसरण झाली. तर चांदीच्या वायदा दरातही 0.60 टक्क्यांची घसरण झाली. एमसीएक्सवर चांदीचा भाव 71, 500 रुपये प्रति किलो इतका झाला होता. तर जून डिलिव्हरीवाल्या सोन्याचे दर एमसीएक्सवर 47, 599 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके झाले आहे. तर ऑगस्टमध्ये डिलिव्हरीवाल्या सोन्याचे भाव 114 रुपयांनी घसरले आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 24 कॅरेटच्या सोन्याच्या भावात 89 रुपयांची घसरण होऊन 47 हजार 700 रुपये प्रति 10 गॅम इतका झाला आहे. तर 23 कॅरेट सोन्याच्या दरात 89 रुपयांची आणि 22 कॅरेट सोन्याच्या दरात 82 रूपयांची घसरण होऊन ते अनुक्रमे 47, 509 आणि 43, 693 रूपये प्रति 10 ग्रॅम इतके झाले आहे. तसेच 18 कॅरेटच्या सोन्याचे दर 67 रूपयांनी घसरून 35, 775 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. चांदीच्या दरातही बुधवारी 102 रूपये प्रति किलोची घसरण झाली. या घसरणीनंतर चांदीचे दर 70, 867 रूपये प्रति किलो इतका झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांचा मोर्चा सोन्यातील गुंतवणूकीकडे वळणार असल्याने आगामी काळात पुन्हा सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.