‘कोरोना’च्या संकटात कर्मचार्‍यांना दिलासा, ‘हे’ क्षेत्र करतंय Increment देण्याची तयारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोनामुळे बर्‍याच कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे सर्वच कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांचे मूल्यांकन (Appraisal)थांबवले होते. त्याच वेळी बर्‍याच कंपन्यांनी कर्मचार्‍यांचे पगार देखील कमी केले तर अनेकांनी त्यांना नोकरीवरून काढून टाकले, पण आता हळूहळू वातावरण बदलत आहे. काही बँक आणि वाहन उद्योग कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना प्रोत्साहित करण्यासाठी पगारात वाढ करण्यास सुरुवात केली आहे.

एचडीएफसी, अ‍ॅक्सिस बँक बोनस देत आहे

एचडीएफसी बँकेने आपल्या कर्मचार्‍यांच्या पगारात वाढ केली आहे. अ‍ॅक्सिस बँकेने आपल्या सुमारे 80 टक्के कर्मचार्‍यांना बोनस जाहीर केले आहेत. आयसीआयसीआय बँक आणि फ्यूचर जनरल यांनीही आपल्या कर्मचार्‍यांच्या पगार वाढीची घोषणा केली आहे. आयसीआयसीआय बँकेने आपल्या 80 हजार कर्मचार्‍यांना 8% वाढ जाहीर केली आहे. उर्वरित बँकाही या मार्गाचा अवलंब करीत आहेत.

वाहन कंपन्या देखील देणार वेतनवाढ

केवळ बँकच नाही, तर वाहन कंपन्याही या मार्गाचा अवलंब करीत आहेत. ते आपल्या कर्मचार्‍यांना बोनस आणि वाढ देण्याचीही तयारी करत आहे. किआ आणि एमजी मोटरने यापूर्वी चल वेतन आणि इतर प्रोत्साहन दिले आहेत. दुसरीकडे महिंद्रा अँड महिंद्रा, हीरो मोटो कॉर्पोरेशन, अशोक लेलँड, टीव्हीएस मोटर, टोयोटा किर्लोस्कर आणि टाटा मोटर्स लवकरच आपल्या कर्मचार्‍यांना वेतनवाढ देणार आहेत. मारुती सुझुकी ऑगस्टमध्ये वाढ देणार आहे, परंतु मागील वर्षांच्या तुलनेत ही वाढ कमी होईल.