खुशखबर ! कोर्टासमोर झुकले ट्रम्प सरकार, परदेशी विद्यार्थ्यांचा Visa रद्द करण्याचा निर्णय मागे

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर युनिव्हर्सिटी आणि परदेशी विद्यार्थ्यांच्या दबावापुढे माघार घेतली आहे. अमेरिकेत राहून ऑनलाइन एज्युकेशन घेत असलेल्या परदेशी विद्यार्थ्यांचा वीजा रद्द करण्याच्या निर्णयाला मोठा विरोध झाल्यानंतर ट्रम्प सरकारने तो मागे घेतला आहे. मंगळवारी कोर्टांत ट्रम्प प्रशासन इमिग्रेशन आणि कस्टम विभागाच्या वकिलांनी म्हटले की, या सुनावणीची आता गरज नाही, कारण आम्ही हा निर्णय मागे घेण्यास तयार आहोत. ट्रम्प सरकारने माघार घेतल्याने अमेरिकेत राहणार्‍या हजारो परदेशी विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

ट्रम्प प्रशासनाने मागील आठवड्यातच आदेश दिला होता की, जे परदेशी विद्यार्थी अमेरिकन युनिव्हर्सिटीजमधून ऑनलाइन एज्युकेशन घेत आहेत, त्यांना परत त्यांच्या देशात जावे लागेल. ट्रम्प प्रशासनाने याचे कारण कोरोना महामारी सांगितले होते आणि म्हटले होते की, ऑनलाइन कोर्ससाठी अमेरिकेत राहण्याची काहीही गरज नाही. अशा सर्व विद्यार्थ्यांचा वीजा रद्द करण्याचे आदेश सुद्धा जारी केले होते. मात्र या आदेशाला जोरदार विरोध करण्यात आला आणि जॉन हॉप्किन्स युनिव्हर्सिटी, हार्वर्ड, एमआयटी (मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) युनिव्हर्सिटीजने मागील बुधवारी कोर्टात या निर्णयाविरोधात एक याचिका दाखल केली होती.

दबावामुळे सरकारने निर्णय केला रद्द
कोर्टात जारी सुनावणी दरम्यान ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय परत घेण्यास सहमती दर्शवली. जस्टिस एलीसन बरोज यांनी सुनावणीत म्हटले की, सरकारने आपला जुना निर्णय रद्द केला आहे. सोबतच जुन्या निर्णयावर सुरू असलेली कारवाई ताबडतोब रोखण्यासाठी सहमती दर्शवली आहे. हार्वर्डचे प्रेसिडेंट लॉरेन्स एस बॅकॉ यांनी युनिव्हर्सिटी कम्युनिटीला दिलेल्या मॅसेजमध्ये म्हटले आहे की, ट्रम्प प्रशासनाने हा आदेश कोणत्याही सूचनेशिवाय दिला होता. असे वाटते की, कॉलेज आणि युनिव्हर्सिटीजवर क्लासरूम उघडण्यासाठी दबाव तयार केला जात आहे. प्रशासनाला विद्यार्थी, इन्स्ट्रक्अर आणि अन्य लोकांच्या आरोग्य आणि सुरक्षेची कोणतीही काळजी नाही.

10 लाख विद्यार्थ्यांवर झाला असता परिणाम
ट्रम्प सरकारने युनिव्हर्सिटीजवर ऑनलाइन कोर्सेस सुरू करण्याचा दबाव आणला होता आणि जेव्हा काही कोर्सेस सुरू झाले तेव्हा विद्यार्थ्यांना परत जाण्याचे आदेश काढले. अमेरिकन सरकारने म्हटले होते की, ज्या विद्यार्थ्यांचे सर्व वर्ग ऑनलाइन शिफ्ट झाले आहेत, त्यांना त्यांच्या देशात परतावे लागेल. या निर्णयाने एकुण 10 लाख विद्यार्थ्यांवर परिणाम होणार होता. अमेरिकेत सध्या 2 लाखपेक्षा जास्त भारतीय विद्यार्थी आहेत, ज्यांना निर्णयानंतर देशात परतावे लागले असते.

अमेरिकेत सर्वात जास्त विद्यार्थी चीनमधून येतात, यानंतर भारताचा नंबर लागतो. ग्रॅजुएशन किंवा पोस्ट ग्रॅजुएशनच्या विद्यार्थ्यांसाठी एफ-1 आणि एम-1 कॅटेगरीचे वीजा जारी करण्यात येतात. यासाठी सरकारच्या या निर्णयाचा परिणाम भारतीय विद्यार्थ्यांवर झाला असता. 2019 मध्ये 2 लाख 2 हजार 14 भारतीय विद्यार्थी अमेरिकेत गेले. 2018 मध्ये 1 लाख 96 हजार 271 आणि 2017 मध्ये 1 लाख 86 हजार 267 विद्यार्थी अमेरिकेत शिकण्यासाठी गेले होते. लागोपाठ 6 वर्षापासून अमेरिकेत भारतीय विद्यार्थी वाढत आहेत. 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये 2.9% जास्त भारतीय विद्यार्थी अमेरिकेत होते.