Brihaspati Rashi Parivartan : 2021 मध्ये पहिल्यांदा 6 एप्रिलला गुरु बदलणार स्वतःची रास, जाणून घ्या काय होणार परिणाम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Brihaspati Rashi Parivartan : गुरु म्हणजेच बृहस्पती 6 एप्रिल, मंगळवारी मकर राशीतून कुंभ राशीत गोचर करेल. 2021 मध्ये गुरुचे हे पहिले राशी परिवर्तन असेल. अजूनपर्यंत गुरु आपला खालचा ग्रह शनीसोबत गोचर करत होता. आता शनीचीच रास कुंभमध्ये गोचर करेल. या राशीत गुरु 13 सप्टेंबरपर्यंत गोचर करेल. मागील 13 महिन्यांपासून मकर राशी शनीसोबत मार्गक्रमण करत असलेला गुरु 6 एप्रिल 2021 सोमवारी रात्री 00:22 वाजता आपली रास बदलून कुंभ राशीत जाईल. कुंभसुद्धा शनीची रास आहे, जी गुरुची शत्रु रास आहे. अशावेळी देश आणि जगासाठी अजूनही वातावरण बदलणार नाही. आता आणखी 13 महिने सर्वकाही यथावकाश चालत राहिल. गुरु 20 जूनला वक्री होऊन 14 सप्टेंबरला पुन्हा मकर राशीत पर येईल आणि 20 नोव्हेंबरपर्यंत मकरमध्ये राहिल, परंतु 20 नोव्हेंबरपासून 13 एप्रिल 2022 पर्यंत कुंभमध्येच मार्गक्रमण करेल.

गुरुला सर्वाधिक शुभ आणि शीघ्रफलदायी ग्रह मानले जाते. गुरु ग्रहाला धन, ज्ञान आणि सत्कर्माचा कारक मानले जाते. हा विवाह आणि सुखी दाम्पत्य जीवनाचा कारक मानला जातो. तसेच बृहस्पती देव देवतांचा सुद्धा गुरु मानला जातो. तो धनु व मीन राशीचा स्वामी आहे. गुरू ग्रहाची चाल बदलल्याने त्याचा परिणाम अनेक राशींवर सकारात्मक पडेल तर काही राशींवर त्याचा नकारात्मक परिणाम दिसून येईल.

गुरुचे परिवर्तन आपल्यासह अनेक राशींसाठी धनलाभ आणि विद्यालाभ घेऊन येईल. या राशी परिवर्तनाने वृषभ, मेष आणि मिथुन राशीवाल्यांसाठी सकारात्मकता आणि आनंदाचा खजिना असेल. या लोकांना विद्येत यश मिळेल. सोबतच धनलाभाच्या बाबतीतही शुभ योग आहेत. तर, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी काळ थोडा अडचणींचा आहे. या लोकांना चिंता सतावतील. तुळ, वृश्चिक राशीवाल्यांना संतती सुखासह धनलाभाचे योग आहेत. या लोकांसाठी काळा खुपच उत्तम आहे.