Chandra Grahan Sutak Kal : 30 नोव्हेंबरला लागणार चंद्र ग्रहण, जाणून घ्या ग्रहणाचा सूतक काळ

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   Chandra Grahan Sutak Kal : या वर्षातील शेवटचे चंद्र ग्रहण(Chandra Grahan) 30 नोव्हेंबरला लागणार आहे. हे चंद्र ग्रहण(Chandra Grahan) अनेक बाबतीत महत्वाचे आहे. या दिवशी कार्तिक पोर्णिमा आहे. अशावेळी याचे महत्व आणखी वाढते. हिंदू कॅलेंडरनुसार, कार्तिक शुक्ल पोर्णिमा तिथीला यावर्षीचे शेवटचे चंद्र ग्रहण लागणार आहे. यावेळी ग्रहण वृषभ राशीत आहे. पंचांगानुसार, या दिवशी रोहिणी नक्षत्र असेल. या दिवसाच्या सूतक काळाविषयी जाणून घेवूयात –

चंद्र ग्रहणाचा सूतक काळ :

हे चंद्र ग्रहण उपछाया ग्रहण आहे. जेव्हा उपछाया ग्रहण लागते तेव्हा सूतक काळ मान्य नसतो. पूर्ण ग्रहणात सूतक काळ मान्य असतो. सामान्य चंद्रग्रहणात सूतक ग्रहणापूर्वी 9 तास अगोदर लागते, जे ग्रहाणाच्या समाप्तीसोबत समाप्त होते. कोणत्याही प्रकारचे शुभकार्य सूतक काळात केले जात नाही. या दरम्यान अनेक गोष्टींकडे लक्ष ठेवावे लागते. परंतु, 30 नोव्हेंबरच्या चंद्र ग्रहणात सूतक काळ मान्य असणार नाही.

चंद्र ग्रहणाची वेळ :

भारतीय वेळेनुसार चंद्र ग्रहण दुपारी 1 वाजून 4 मिनिटांनी लागेल. ज्यामध्ये चंद्र एका छायेच्या अगोदर स्पर्श होईल. हे दुपारी 3 वाजून 13 मिनिटांनी होईल. ग्रहणाचे मुख्यतः तीन प्रकार आहेत. पूर्ण चंद्रग्रहण, अर्ध चंद्रग्रहण आणि प्युनंब्रल चंद्रग्रहण. येणारे ग्रहण हे प्युनंब्रल चंद्रग्रहण आहे. हे सायंकाळी 5 वाजून 22 मिनिटांनी उपछायेतून अंतिम स्पर्श करेल. यावेळी चंद्रग्रहण भारत, अमेरिका, पॅसिफिक महासागर, ऑस्ट्रेलिया आणि आशियामधून पाहता येऊ शकते. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या प्रत्यक्ष छायेत न जाता तिच्या उपछायेतून परततो त्यास उपछाया चंद्रग्रहण म्हणतात. यात चंद्रावर हलका धुरकट थर तयार होतो.