Ganesh Chaturthi 2020 : गणेश चतुर्थीच्या दिवशी ‘या’ प्रकारे होतं तुमच्या कष्टाचं निराकारण

पोलीसनामा ऑनलाईन : दरवर्षी गणेश चतुर्थीला लोक आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला घरी आणतात. भगवान गणेश आपल्या भक्तांचे सर्व अडथळे व अडचणी दूर करतात. यामुळेच गणेशाला विघ्नहर्ता देखील म्हटले जाते. सर्वांच्या घरी आदराने गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते आणि अकराव्या दिवशी धूमधडाक्याने त्यांचे विसर्जन केले जाते. सनातन धर्मात गणेशाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. गणपतीला गजानन किंवा विघ्नहर्ता देखील म्हणतात. गजानन हे रिद्धि-सिद्धि आणि सुख-समृद्धी प्रदाता मानले जातात. शास्त्रानुसार गणपती बाप्पा आपल्या भक्तांना त्रास, पीडा, दारिद्र्य आणि आजारांपासून मुक्त करतात.

या दिवसाला गणेशोत्सवही म्हणतात. याचा अर्थ गणेश चतुर्थीचा उत्सव. हा उत्सव 10 दिवसानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपेल. या दिवशी लोक गणपती बाप्पांना निरोप देतात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भाविक मोठ्या धुमधडाक्यात गणेशाचे विसर्जन करतात. शास्त्रानुसार, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला भगवान श्री गणेश यांचा जन्मदिन साजरा केला जातो, ज्याला गणेश चतुर्थी म्हणतात.

अशाप्रकारे दूर होतील आपले त्रास :
चतुर्थीला गणेशाची पूजा केल्यास विशेष वरदान मिळते. तसेच, उपवास केला तर कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर सामंजस्यात वाढ होते. असे म्हणतात की एखाद्या व्यक्तीच्या जीवनात काही अडथळा असेल तर त्याने संकष्टी चतुर्थीला भगवान गणेशाला दही अर्पण करावा, ज्यामुळे त्यांना फायदा होतो. यामुळे बिघडलेली कामेही बनतात. त्याच वेळी, जर एखादा व्यक्ती त्रासांनी वेढलेला असेल तर त्याने चतुर्थीला साखर मिसळलेल्या दहीमध्ये सावली पाहून गणेशाला अर्पण करावे. यामुळे रखडलेले काम पूर्ण होते. गणेश चतुर्थीला गणेशाला दुर्वा अर्पित करावा. दुर्वा गणपतीला खूप प्रिय आहे. असे म्हणतात की, दुर्वात अमृताचा वास असतो. असे मानले जाते की जर भगवान गणेशाला दुर्वा अर्पण केला गेला तर आरोग्याचा फायदा त्याला मिळतो.

गणेश चतुर्थीला ‘डंडा चौथ’ म्हणूनही ओळखले जाते. गणपती बाप्पाला रिद्धी -सिद्धी आणि बुद्धीचा दाता म्हंटले जाते. असे मानले जाते की, या दिवसापासून विद्याध्यायनाची सुरुवात होते. या दिवशी मुले दांड्या वाजवून खेळतात. यामुळे बर्‍याच ठिकाणी या सणाला डंडा चौथ असेही म्हणतात. असं म्हणतात की, गणेश चतुर्थी हा गणपतीचा जन्मदिन आहे. या दिवशी गणरायाच्या पूजेस विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रात गणेश चतुर्थी हा सण सुमारे दहा दिवस साजरा केला जातो. त्याला गणेशोत्सवही म्हणतात. असा विश्वास आहे की त्याचा जन्म मध्यान्ह काळात झाला होता. अशा परिस्थितीत दुपारी त्यांची पूजा केली जाते.