25 मार्चला गुढी पाडवा, जाणून घ्या मुहूर्त, कथा, महत्व, तोरण आणि ध्वज लावण्याचा नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुढीपाडवा महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि गोव्या सहित दक्षिण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. चैत्र मासच्या शुल्क प्रतिपदेला गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मात या सणाला मोठी मान्यता आहे. मानले जाते की या दिवशी ब्रम्ह देवांनी सृष्टीची निर्मिती केली. यंदा गुढीपाडवा 25 मार्चला येत आहे.

प्रतिपदा तिथि आरंभ – 14:57 (24 मार्च 2020)
प्रतिपदा तिथि समाप्त – 17:26 (25 मार्च 2020)

तोरण पताका –
चैत्र शुल्क प्रतिपदा गुढीपाडवाच्या नावे ओळखला जातो. या दिवशी घरावर पताका आणि तोरण लावण्याची परंपरा आहे.

गुढीचा अर्थ काय आहे –
विजय पताका असा गुढीचा अर्थ आहे, घरावर पताका लावणे म्हणजे गुढी उभारणे,
म्हणजे त्या व्यक्ती आणि व्यक्तींच्या कुटूंबीयांचा विजय मानला जातो. हे विजयाचे प्रतिक असते. यादिवशी आपल्या घराच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यात म्हणजेच आग्नेय दिक्षेला पाच हात उंच बाम्बूवर सव्वा दोन हाताचा लाल रंगाचा पताका लावला जातो. अनेक लोक ध्वज लावतात. हा पताका तसा तर तीन कोपऱ्यांचा असतो आणि ध्वज चार कोपऱ्यांचा असतो. तुम्ही यातील तुम्हाला हवे ते लावू शकतात.

ध्वज किंवा पताका लावताना म्हणजेच गुढी उभारताना सोम, दिगंबर कुमार आणि रूरु भैरवाचे नाव घ्या. त्याने तुमच्या गुढीची रक्षा होते अशी मान्यता आहे. त्यांच्याकडे आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा. यामुळे तुमच्या सुख समृद्धीत वाढ होईल. दुसरीकडे तुम्हाला शुभ परिणाम देखील मिळतील.

गुढीपाडवा साजरा करण्याची कथा –
दक्षिण भारत क्षेत्र रामायण काळात बालीचे शासन क्षेत्र होते. जेव्हा प्रभु रामाला काळाले की लंकपती रावणाने माता सीतेचे हरण केले आहे तेव्हा माता सीतेला परत आणण्यासाठी आणि रावणाच्या सेनेशी युद्ध करण्यासाठी एका सेनेची आवश्यकता होती. दक्षिण भारतात जेव्हा प्रभू राम आले तेव्हा त्यांची भेट सुग्रीवशी झाली. सुग्रीवने त्यांना बालीच्या कुशासनाबद्दल माहिती दिली आणि आपली असमर्थता दर्शवली. त्यानंतर प्रभू रामाने बालीचा वध करुन दक्षिण भारतातील लोकांना मुक्त केले. मान्यता आहे की तो दिवस चैत्र शुक्ल प्रतिपदेचा होता. यामुळे या दिवशी गुढी म्हणजेच विजयाचा पताका उभारला जातो.

आणखी एक प्राचीन कथा शालीवाहनची आहे, त्यांनी मातीचे सैन्य बनवून त्यात जीव फूकुंन शत्रुला पराभूत केले होते. याच दिवशी शालीवाहन शकांचा प्रारंभ मानला जातो.

गुढीपाडव्यामुळे आरोग्याचा लाभ –
आरोग्याच्या दृष्टीने देखील या पर्वाचे महत्व आहे. याचमुळे या दिवशी तयार करण्यात येणार पदार्थ अत्यंत खास आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मग तो आंध्रप्रदेशात वाटला जाणारा प्रसाद पच्चडी असो, किंवा महाराष्ट्रात तयार करण्यात येणारी पुरणपोळी. पच्चडीबद्दल सांगितले जाते की अनुशीपोटी याचे सेवन केल्यास याने चर्म रोग दूर होतो तसेच माणसाचे आरोग्य अधिक सुधारते. तर पुरणपोळी गुळ, लिंबाचे फुल, चिंच यापासून तयार केली जाते.