सन 2025 मध्ये युरोपची लोकसंख्या जवळपास होईल ‘शून्य’, जाणून घ्या ‘बाबा वेंगा’ यांच्या 5 मोठ्या भविष्यवाणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बाबा वेंगा यांचे नाव तुमच्यापैकी बर्‍याच जणांनी ऐकले असेल आणि बहुतेकांनी ऐकलेले नसेल. त्या बल्गेरियात जन्मलेल्या एक दृष्टिहीन भविष्यवक्त्या होत्या. त्यांचे नाव वेंगेलिया पांडेवा दिमित्रोवा होते. असे म्हणतात की त्यांची दृष्टी एका रहस्यमय वादळामध्ये गेली. परंतु असे म्हणतात की ज्यांना डोळे नसतात त्यांना डोळ्याशिवाय बरेच काही दिसू शकते. असेच काहीसे बाबा वेंगांबद्दल घडले. बाबा वेंगा 12 वर्ष इतर लोकांसारखे सामान्य जीवन जगल्या आणि तेव्हापासून त्यांनी भविष्य सांगून लोकांना मदत करण्यास सुरवात केली. त्यांनी अशा बर्‍याच भविष्यवाण्या केल्या आहेत ज्या नंतर सत्यात उतरल्या आहेत. 2001 मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला आणि 2004 मध्ये त्सुनामीचा अंदाजदेखील यात होता. आज या पोस्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला बाबा वेंगांद्वारे केलेल्या 5 भविष्यवाण्यांबद्दल माहिती देत आहोत.

1. सन 1989 मध्ये, बाबा वेंगांनी असे भाकीत केले होते की 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेच्या न्यूयॉर्क ट्विन टॉवरवर दहशतवादी हल्ला होईल आणि निष्पाप लोक बळी ठरतील.

2. बाबा वेंगांनी असेही भाकीत केले होते की 2016 मध्ये युरोपमध्ये इस्लामिक अतिरेक्यांद्वारे हल्ला होईल आणि यामुळे युरोपलाही बरेच नुकसान सहन करावे लागणार आहे. हे बऱ्याच वर्षांपर्यंत चालेल.

Advt.

3. बाबा वेंगांनी अशीही भविष्यवाणी केली होती की अमेरिकेचे 44 वे राष्ट्राध्यक्ष आफ्रिकन-अमेरिकन होतील आणि आपल्या सर्वांना माहितच आहे की बराक ओबामा अमेरिकन अध्यक्ष बनले होते.

4. बाबा वेंगा यांनी आपल्या मृत्यूच्या आधी सांगितले होते की सन 2025 मध्ये युरोपमधील लोकसंख्या जवळजवळ संपुष्टात येईल किंवा शून्य होईल.

5. सन 2028 मध्ये मनुष्य नवीन उर्जेचा स्रोत शोधून शुक्रावर पोहोचेल. अन्नधान्य देखील कमी होईल. तसेच मानवी अंतराळ मोहीम बुधच्या दिशेने देखील जाईल. तेथे मानवनिर्मित अवकाश अभियान असेल.

(या लेखातील कोणतीही माहिती/ सामग्री/ गणनामध्ये असलेली अचूकता किंवा विश्वसनीयता याची हमी नाही. ही माहिती विविध माध्यमे/ ज्योतिषी/ पंचांग/ प्रवचन/ विश्वास/ धार्मिक ग्रंथांमधून ती आपल्याला पाठविली गेली आहे. आमचे उद्दीष्ट फक्त माहिती पोहोचविणे हे आहे, त्यामुळे वापरकर्त्यांनी यास केवळ माहितीखाली घ्यावे. या व्यतिरिक्त, याच्या कोणत्याही वापराची जबाबदारी वापरकर्त्यावरच राहील.)