January 2021 Rashifal : नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात यांचे चमकणार नशीब, वाचा जानेवारी 2021 चे राशिफळ

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   January 2021 Rashifal : आजपासून नवे वर्ष 2021 चा प्रारंभ झाला आहे. नववर्ष 2021 लोकांसाठी नव्या आशा, शक्यता, संधी आणि आव्हाने घेऊन आले आहे. नव्या वर्षाचा पहिला महिना जानेवारी काही राशीच्या जातकांसाठी नशीब चमकावणारा आहे. त्यांना लक्ष्मीची साथ मिळेल, यश प्राप्त होईल. काही प्रगतीच्या पथावर पुढे असतील. काही राशीच्या जातकांना नव्या संधी मिळतील, पद तसेच प्रतिष्ठा प्राप्त होईल. काहींना सतर्क राहावे लागेल. नव्या एनर्जीने आव्हानांशी ठामपणे सामना करावा लागेल, जेणेकरून यश मिळेल. जानेवारी 2021 चे बारा राशींचे मासिक राशिफळ जाणून घेवूयात…

मेष-

या महिन्यात मित्र किंवा कुटूंबासह एखाद्या धार्मिक किंवा करमणुकीच्या ठिकाणची भेट द्याल. आत्मविश्वासामुळे यश मिळेल. कोणत्याही कामात उतावळेपणा करू नका. तुम्ही भाग्यशाली तर आहातच, आता श्रीमंतही व्हाल. एकाग्रता आणि समर्पण आपल्याला यशस्वी करेल. कामाच्या ठिकाणी, गटांमध्ये, कॉन्फरन्समध्ये आपल्या वक्तृत्वाची छाप पडेल. पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये भाग्यवान ठराल. सट्टेबाजी, लॉटरी इत्यापासून लाभाचा योग आहे.

वृषभ –

तुमचे व्यक्तिमत्व केवळ तुम्हालाच परिपूर्णतेची जाणीव करून देत नाही तर, कौटुंबिक पातळीवरही तीव्रतेने जाणवते. रागावर नियंत्रण ठेवाल आणि कुटुंबात ऐक्य आणि सखोलता येईल. सामर्थ्य निर्धार, एकाग्रता, उत्साह आणि ऊर्जा यांचा योग आहे. दिशा योग्य असल्याने करियर होईल. व्यवसायात यश, लोकप्रियता मिळेल. सार्वजनिक प्रतिमा सुधारण्याची खात्री आहे. तुम्हाला शांतता आणि सौहार्द हवे आहे. या टप्प्यात आपण जे काही प्रयत्न कराल त्यामध्ये एक खास प्रकारचे यश हाती लागेल.

मिथुन-

जीवन जगण्याची तुमची उत्तम पद्धत आहे. वैवाहिक जीवनात तुरळक वाद वगळता स्थिती सामान्य राहील. एखादी नवीन योजना अंमलात आणण्याची वेळ आली आहे. तुम्ही तुमच्या वेळेची सुरूवात कामाने करता समारोपही कामाने करता. तथापि, आता कामाबाबत ’डेडलाइन आणि डिमांड’चा दबाव सहन करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत आपण संकल्प, भावनात्मक आणि आर्थिक मागण्या, घरगुती आघाडीवर सहकार्याचा आधार घेता.

कर्क-

तुमची अध्यात्मिकता आणि भौतिक यश मिळून चमकदार मानसिकता तयार होईल. शांत मानसिक स्थितीत सामुहिक हालचाली कराल. तुमचा विश्वास, सद्भभावना, शांततेने प्रकरणे मार्गी लावण्याची भूमिका आपल्याला कामातील व्यस्तता असूनही सहजता देईल. अंतर्गत शोधासाठी प्रेरित व्हाल, परंतु असे करणे सोपे नसेल, हे आपल्याला माहित आहे. प्रवासाची शक्यता आहे. अपेक्षित परिणाम मिळवण्यासाठी आपले जनसंपर्क कौशल्य, मधुर शब्द आणि आकर्षण यांचा वापर कराल. कुटुंब आताही तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. अनेक दिशांनी ओढाताण, दबाव असूनही स्वतावर लक्ष द्याल.

सिंह –

नोकरीत उच्च अधिकार्‍यांच्या उपेक्षेला बळी पडू शकता. दुय्यम कर्मचार्‍यांशी वादाची स्थिती होऊ शकते. व्यवसायात उलथापालथ होईल. कौटुंबिक आणि आर्थिक बाबींचा जोर राहील. फंड, लोन, टॅक्स प्रकरणांवर लक्ष केंद्रित कराल. ही प्रकरणे मार्गी लावण्यासाठी व्यवहारिक मार्ग अवलंबाल, हे सुरू असताना कौटुंबिक जीवनाकडे दुर्लक्ष करणार नाही. सामायिक संपत्ती आपल्यासाठी समस्या बनू शकते.

कन्या-

हा काळ आर्थिक बाबतीत थोडा त्रासदायक ठरेल. स्वाभिमान कायम राखण्यासाठी जास्त मेहनत होईल. विद्यार्थ्यांसाठी संघर्षाचा काळ आहे. नोकरीत केलेले प्रयत्न निर्रथक ठरतील. समजूतदारपणे मेहनत करा, आपल्यासाठी आणि दुसर्‍यांसाठी. तुम्ही काही वेगळ्या प्रकारच्या प्रयत्नांची आवश्यकता आहे. तुम्हाला गुप्त गोष्टी, भिती आणि गुंतागुतीच्या भावनांवर विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा लागेल, स्वताला मुक्त करण्याचा प्रयत्न करावा लागेल. मार्गांवर लोकांनी दिलेल्या अनेक ठेच खाव्या लागतील, परंतु काळ तुमचा आहे.

तुळ-

तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाच्या बळावार स्थिती आपल्यासाठी अनुकूल करण्यात यशस्वी व्हाल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. घरात एखादी शुभवार्ता मिळेल. आता आपल्या जीवनात एक निश्चित स्टाइल आणि संतुलन येईल. जे चांगले असेल, ते तुम्ही पूर्ण कराल. जीवन स्तर मजबूतीने तुमचा प्रेरणा बनेल आणि आत्मविश्वास भरेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहचाल. स्वताला अनेक क्षेत्रात उभे कराल.

वृश्चिक-

मागील दिवसांचे लाभ आता आणखी वाढतील. तुम्हाला दुसर्‍या लोकांच्या सोबतीत सहजता जाणवेल आणि याचा आनंद घ्याल. मौजमस्ती, रोमान्सचा काळ आहे, पण सावध राहा. मनोरंजन, सुख, आराम सर्व तुमच्यासाठी असेल. तुम्ही वेळेचा सदुपयोग करून घेण्यासाठी दक्ष असाल. सर्व सुख, आराम भरपूर असेल, सुख समृद्धी, धन संपत्तीचा काळ हातात येत असल्याचे दिसत आहे, तुमच्या शिवाय अन्य कुणीही माणूस तिथपर्यंत पोहचू शकत नाही, आणि ते हिसकावू शकत नाही.

धनु-

दूसर्‍यांच्या समस्या सोडवण्यापूर्वी तुम्हाला सावध राहावे लागेल की, तुम्ही खोटी निंदा, द्वेष यातून बाहेर येऊन आपले आकर्षण, विश्वास आणि आशा दबल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या. कामाचा दबाव वाढेल. सोबतच वैवाहिक किंवा रोमान्सपूर्ण संबंधांच्या व्यक्तीगत मागण्या सुद्धा वाढतील. घराच्या बाबतीतही मागण्या वाढतील. पुन्हा एकदा बाजूला होऊन विचार कराल, पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला एकांत हवाय. अंतरिक भावना, आशा आणि स्वप्न, विशेषकरून जीवनात प्रियजनांना वाटू इच्छिता. तुम्हाला तुमच्या यशासह भविष्यातील योजना तसेच महत्वकांक्षासुद्धा इतरांमध्ये वाटण्याची इच्छा आहे.

मकर-

शेयर बाजार आणि सट्ट्याचे काम करणार्‍यांसाठी उपयुक्त संधी आहे. वैयक्तिक, व्यापारी संबंध वाढतील आणि भविष्यात काहीतरी करण्याची स्थिती निर्माण होईल. तुमचे घर, जोडीदार, तुमच्या वस्तू महत्वाच्या असतील. पैसा आणि संपत्तीच्या प्रकरणांत चांगला काळ आहे. छोटे-मोठे दौरे, संपर्क तसेच संचार सुद्धा महत्वपूर्ण आहे, एकुणच संमिश्र परिणामांचा काळ आहे. दृष्टिकोणात कठोरता जाणवेल, जो तुम्हाला न झुकण्यासाठी प्रेरित करेल. नरमाईचे धोरण चांगले परिणाम आणेल.

कुंभ –

आपले काम, सार्वजनिक प्रतिमा, व्यक्तिमत्व महत्वाचे असेल. भागीदारी, व्यवसायातील प्रतिबद्धता, मागणी, भागीदारीसंबंधी बारकावे, तुमची वेळ आणि विचारांना घेरलेले राहतील. तुम्हाला उत्तम जनसंपर्क, कौशल्य आणि चांगली प्रतिमा दर्शवावी लागेल. यशस्वी आणि समाधानकारक टप्पा आहे. संकल्प आणि उर्जेने परिपूर्ण आहात, जे मेहनत आणि प्रमाणित फायद्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. कामाच्या बाबतीत यश देणारा काळ आहे. परंतु महत्त्वाची बाब ही आहे की वैयक्तिक समीकरणे, कौटुंबिक जीवन, वैवाहिक आनंद, सूख-सुविधा आणि सद्भावना टिकविण्यासाठी प्रयत्नशील राहाल.

मीन-

या महिन्यात तुमचा व्यापर, नोकरी, विशेषकरून आपल्या भविष्यातील योजनांबाबत गोपनीय राहाल. तुमच्या हालचाली आणि योजना कुणालाही समजू नये असे आपल्याला वाटते. तुमची भूमिका आणि विचारांत नाट्यमय बदल होतील. बदलांचा हा टप्पा मागील काळापासून सुरू आहे. याचा प्रभाव तुमचे करियर आणि उत्पन्नात सुद्धा पहावयास मिळेल. आर्थिक आघाडीवर तुम्ही दिर्घकालिन गुंतवणुकीबाबत विचार कराल. अतिरिक्त धन कमावण्यासाठी अतिरिक्त काम करू शकता.