Vastu Tips : घरातील वास्तुदोषापासून सुटका मिळून देतील ‘या’ 5 गोष्टी, कधीच पैशांची ‘चणचण’ भासणार नाही

पोलीसनामा ऑनलाइन – अनेकदा घरात वास्तू दोष असल्यामुळे मन अस्वस्थ राहते.कारण घरातील गोष्टींची ठेवाठेव हे वास्तूशी निगडित आहे.त्याचबरोबर काही लोकांना पैशांची भीती वाटते,त्यामुळे ते नेहमी परेशान राहतात. वास्तुशास्त्रानुसार हे घरातील वास्तू दोषांमुळे असू शकते.जर तुम्हाला घरातील वास्तू दोषांपासून मुक्त करून पैशाशी संबंधित त्रासातून मुक्त करायचे असेल तर वास्तुनुसार या गोष्टी घरात ठेवणे आपल्यासाठी फायद्याचे ठरू शकते. कोणत्या ५ गोष्टी जाणून घ्या ज्यामुळे घरातील वास्तुदोषच दूर होणार नाहीत तर घरात नेहमीच पैशांचा भरणा होईल.

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावा लक्ष्मी कुबेर चित्र
वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात वास्तु दोष असल्यास त्या दूर करण्यासाठी निश्चितच लक्ष्मी कुबेराची मूर्ती घराच्या मुख्य दरवाजावर लावा. या दोघांचा फोटो लावल्यास घरात पैशांची कमतरता कधीच येणार नाही.

घरात वास्तु देवताची मूर्ती ठेवा
वास्तुशास्त्रानुसार एखाद्याच्या घरात वास्तु दोष असेल तर त्यांनी वास्तू देवताची मूर्ती आपल्या घरात ठेवली पाहिजे. असे केल्याने घराचे वास्तुदोष दूर होतील व घरात पैशाची कमतरता कधीच येणार नाही.

धातूपासून बनविलेला कासव
वास्तुनुसार घरात धातूचा कासव किंवा मासे ठेवणे शुभ मानले जाते. हे ठेवल्यास घरातील सर्व समस्या संपतात.

क्रिस्टल पिरॅमिड
वास्तुशास्त्रानुसार क्रिस्टलचा पिरॅमिड घरात पैसेही देते. जास्तीत जास्त कुटुंबातील लोकांचे लक्ष जाईल अश्या ठिकणी घराच्या त्या भागात हा पिरामिड ठेवा.

पाण्याचा जार
वास्तुनुसार घरात पाण्याचा जार ठेवला पाहिजे. असे केल्याने घरात पैशाची कमतरता कधीच येत नाही. जर तुम्हाला जार सापडत नसेल तर घरात मातीचा एक छोटे भांडे ठेवा. पण त्यातील पाणी संपणार नाही याची काळजी घ्या,आणि जर संपलेच तर लगेच भरा. घराच्या उत्तर-दक्षिण भागात हा जार किंवा लोटा ठेवा.