Ram Mantra : रामापेक्षा मोठं रामाचे नाव, जाणून घ्या रामाचे ‘ते’ 8 मंत्र, ज्यामुळं मिळतं ‘यश’, ‘शक्ती’ आणि ‘सर्वसिध्दी’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   तुम्ही रामापेक्षा रामाचे नाव मोठे असल्याचे ऐकले असेलच, परंतु भगवान श्री रामाच्या नावाचे वैभव गोस्वामीजींनी किती वर्णन केले आहे हे तुम्हाला माहिती आहे का? या नावाचा अर्थ आणि औचित्य काय आहे? ज्योतिषाचार्य साक्षी शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, ‘श्रीराम’ म्हणजे भगवान श्री राम यांना बोलावणे. ही भगवान राम यांच्यासाठी हाक आहे. ‘जय राम’ ही त्यांची स्तुती आहे, तर ‘जय जय राम’ हे त्यांचे पूर्ण समर्पण आहे. दररोज भगवान श्री रामाच्या मंत्राचा जप केल्याने मनोकामना पूर्ण होते. चला तर मग या चमत्कारीक ‘राम मंत्रा’बद्दल जाणून घेऊया…

सर्वार्थसिद्धि श्री राम ध्यान मंत्र
ॐ आपदामप हर्तारम दातारं सर्व सम्पदाम, लोकाभिरामं श्री रामं भूयो भूयो नामाम्यहम ! श्री रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः !

कोणत्याही संकटात मदत करण्यासाठी

लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम्। कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये॥ — आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम्। लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्।।

गृह क्लेश निवारण आणि सुखदायक

हे रामा पुरुषोत्तमा नरहरे नारायणा केशवा। गोविन्दा गरुड़ध्वजा गुणनिधे दामोदरा माधवा॥ हे कृष्ण कमलापते यदुपते सीतापते श्रीपते। बैकुण्ठाधिपते चराचरपते लक्ष्मीपते पाहिमाम्॥

सगळीकडे यशासाठी

” ॐ राम ॐ राम ॐ राम ह्रीं राम ह्रीं राम श्रीं राम श्रीं राम – क्लीं राम क्लीं राम। फ़ट् राम फ़ट् रामाय नमः ।

दररोज देवाची आठवण ठेवण्यासाठी
|| श्री राम जय राम जय जय राम ||

मनोकामना पूर्ण होण्यासाठी
|| श्री रामचन्द्राय नमः ||

संकटात संरक्षण करण्यासाठी
|| राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे । सहस्त्र नाम तत्तुन्यं राम नाम वरानने ||

मुक्ती आणि देवाच्या प्रेमासाठी
|| नाम पाहरु दिवस निसि ध्यान तुम्हार कपाट ||
|| लोचन निजपद जंत्रित जाहि प्राण केहि बाट ||

भगवान राम यांचे नाव स्वतःमध्ये एक महामंत्र आहे. राम नावाचा महिमा अपरंपार आहे. या व्यतिरिक्त राम नावाचे मंत्र सर्व प्रकारच्या स्वरूपात गृहित धरले आहे. याचा जप केल्यास ब्रह्म ज्ञानाची प्राप्ती सहज होते. रामाचे नाव इतर हजार नावांपेक्षा अधिक आहे. राम मंत्राला तारक मंत्र देखील म्हणतात. या मंत्राचा जप केल्याने सर्व दु:ख संपतात.