Navagraha Mantras : ‘या’ मंत्रांद्वारे दूर करा नवग्रहांचे दोष, जीवनात मिळेल ‘यश’, ‘धन-वैभव’ आणि ‘समृद्धी’

जीवनाच्या या धावपळीत सामान्य माणूस दोन पैसे कमावण्यासाठी आणि वाचवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करत आहे. परंतु, अनेकदा खुप प्रयत्न करूनही ना त्याला पैसा मिळत ना बचत होत. ज्योतिषनुसार आपल्या जीवनाशी संबंधित तमाम प्रकारच्या सुख-दु:खांचा आपल्या कुंडलीतील नऊ ग्रहांशी थेट संबंध असतो. ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी आणि त्यांचे शुभ परिणाम मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रात अनेक प्रकारचे उपाय सांगितले आहे. जे केल्याने जीवनातील अनेक समस्या दूर होतात, तसेच सुख, समृद्धी आणि भाग्य वाढते.

1. सूर्य

जीवनात सुख-संपत्ती आणि साहस कायम ठेवण्यासाठी सूर्यदेवाची कृपा लाभणे जरूरी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही जातकाच्या कुंडलीत सूर्याची दशा आरोग, संपत्ती, सुख-शांती यावर परिणाम करते. एवढेच नव्हे, तर राजा पासून रंक बनवण्यातही परिणाम करते. जन्मसमयी ग्रहांचा राजा सूर्य मजबूत अवस्थेत असेल, तर जातक राजा, मंत्री, सेनापती, प्रशासक, प्रमुख, धर्म प्रचारक इत्यादी बनतो. परंतु, कुंडलीत सूर्य निर्बळ अवस्थेत असेल तर तो शारीरीक तसेच यशाच्या दृष्टीने खुपच वाईट परिणाम देतो.

सूर्यदेवाचे शुभ परिणाम वाढवण्यासाठी आणि त्यांची नाराजी दूर करण्यासाठी कधीही खोटे बोलू नका. हा उपाय केल्याने सूर्यसंबंधी दोष दूर होतील आणि शुभफळ मिळण्यास सुरूवात होईल. सोबतच दररोज उगवत्या सूर्याचे दर्शन आणि त्यांना ’ॐ घृणी सूर्याय नम: म्हणत जल अर्पण केले पाहिजे. दररोज सूर्याला जल अर्पण केल्यानंतर लाल आसनावर बसून पूर्व दिशेला तोंड करून खाली मंत्राचा 108 वेळा जप करा.

”एही सूर्य सहस्त्रांशो तेजोराशे जगत्पते।

अनुकम्पय मां भक्त्या गृहणार्ध्य दिवाकर॥”

2. चंद्र

सूर्याप्रमाणे चंद्र देखील प्रत्यक्ष देवता आहे. नवग्रहांत चंद्र देवतेला माता आणि मनाचा कारक मानले जाते. कुंडलीत चंद्र ग्रह अशुभ असल्यास मनुष्याच्या मनावर पूर्ण परिणाम होतो. चंद्र दोषामुळे गृहकलह, मानसिक आजार, आई-वडीलांचे आजारपण, दुर्बलता, पैशाची कमतरता यासारख्या समस्या समोर येतात. चंद्रदेवाचे शुभफळ मिळवण्यासाठी आणि दोष दूर करण्यासाठी जास्तीत जास्त साफ-सफाईवर लक्ष द्या. चंद्रदोष दूर करणे आणि त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी चंद्र देवतेच्या खालील मंत्राचा जप खुप शुभ आणि परिणामकारक ठरतो.

ॐ ऐं क्लीं सोमाय नम:॥

ॐ श्रां श्रीं श्रौं स: चन्द्रमसे नम:॥

दधिशंख तुषाराभं क्षीरदार्णव संभवम।

नमामि शशिनं सोम शम्भोर्मकुट भूषणम ॥

3. मंगळ

दुर्दम्य साहस आणि पराक्रमी पृथ्वीपुत्र मंगळाला ग्रहांचा सेनापती मानले जाते. वैदिक ज्योतिषनुसार कोणत्याही व्यक्तीमध्ये ऊर्जेचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी मंगळ दोषाचा प्रभाव दूर करणे अंत्यत आवश्यक असते. शनीप्रमाणे मंगळ ग्रहाच्या अशुभतेमुळे सामान्यपणे लोक घाबरतात. मंगळ देवतेची कृपा मिळवण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित दोष दूर करण्यासाठी या मंत्राचा जप करा.

ॐ अं अंगारकाय नम:।

धरणीगर्भसंभूतं विद्युत्कांती समप्रभम।

कुमारं शक्तिहस्तं च भौममावाह्यम।

4. बुध

ज्योतिष शास्त्रानुसार बुध बुद्धी, व्यापार, त्वचा आणि पैशांचा ग्रह आहे. बुध ग्रहाचा रंग हिरवा आहे. तो नवग्रहांमध्ये शारीरिकदृष्ट्या सर्वात कमजोर आणि बौद्धिकदृष्ट्या सर्वात पुढे आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीला बुधदेवाची कृपा आणि शुभप्रभाव अत्यंत आवश्यक आहे. जर कुंडलीत बुध ग्रह कमजोर किंवा नीच असेल तर तुम्ही बुध ग्रहाचे शुभ परिणाम मिळवण्यासाठी बीज मंत्राचा जप करा.

’ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम:॥

प्रियंगुकलिकाश्यामं रूपेणाप्रतिमं बुधम।

सौम्यं सौम्य गुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम॥

5. गुरू

ज्योतिषमध्ये देवतांचे गुरू बृहस्पती यांना एक शुभ देवता आणि ग्रह मानले जाते. गुरू ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे सुख, सौभाग्य, दिर्घायुष्य, धर्म लाभ इत्यादी मिळते. सामान्यपणे देवगुरु बृहस्पती हे शुभफळच प्रदान करतात, परंतु कुंडलीत हे एखाद्या पाप ग्रहासोबत असल्यास कधीकधी अशुभ संकेत सुद्धा देऊ लागतात. अशावेळी गुरूची कृपा मिळवण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित दोष दूर करण्यासाठी नियमित तुळस किंवा चंदनाच्या माळेने ’ॐ बृं बृहस्पतये नमः’ चा 108 वेळा जप आवश्य करा.

देवानां च ऋषीणां च गुरुं कांचनसंनिभम।

बुद्धिभूतं त्रिलोकशं तं नमामी बहस्पतिम॥

6. शुक्र

ज्योतिषमध्ये शुक्र ग्रहाला जीवनाशी संबंधित भौतिक सुख-सुविधांचा कारक मानतात. शुक्र ग्रहामुळे एखाद्या जातकाच्या जीवनात स्त्री, वाहन, धन इत्याचीचे सुख निश्चित होते. कुंडलीत शुक्र मजबूत असल्यास सर्व सुखांची प्राप्ती होते. परंतु अशुभ असल्यास अनेक प्रकारचे आर्थिक त्रास सहन करावे लागतात. दाम्पत्य जीवनात सुखाचा अभाव जाणवतो. शुक्रग्रहाचा शुभ परिणाम मिळवण्यासाठी या मंत्राचा जप करा.

ॐ शुं शुक्राय नम:।

ॐ हिमकुन्दमृणालाभं दैत्यानां परमं गुरुम

सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम॥

7. शनी

कुंडलीत शनी असे देव आहेत, ज्यांना लोक नेहमी घाबरतात. परंतु, शनी हे कर्माचे देवता आहेत आणि तुम्ही केलेल्या कार्याचे फळ आवश्य देतात. जर तुमच्या कुंडलीत शनीदोष असेल तर तो दूर करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या वागण्यात परिवर्तन करा. विशेषकरून आपल्या आई-वडिलांचा सन्मान करा. सोबतच शनीदेवाशी संबंधित मंत्रजप करा. शनीदेवाचा हा मंत्र खुप प्रभावी आहे. शनीदेवाला समर्पित हा मंत्र श्रद्धेने जपल्याने निश्चित लाभ होईल.

ॐ शं शनैश्चराय नमः।

ॐ प्रां प्रीं प्रौ सं शनैश्चराय नमः।

सूर्य पुत्रो दीर्घ देहो विशालाक्ष: शिव प्रिय:।

मंदाचाराह प्रसन्नात्मा पीड़ां दहतु में शनि:॥

8. राहू

कुंडलीत राहु आणि केतु छाया ग्रह आहेत. कुंडलीत जर राहु अशुभ स्थितीत असेल तर व्यक्तीला सहजपणे यश मिळत नाही आणि समस्या कायम राहतात. कुंडलीतील राहूदोष दूर करण्यासाठी हा मंत्रजप केल्यास शुभफळ प्राप्त होते.

’ॐ भ्रां भ्रीं भ्रौं स: राहवे नम:’।

अर्धकायं महावीर्यं चंद्रादित्यविमर्दनम।

सिंहिकागर्भसम्भूतं तं राहुं प्रणमाम्यहम॥

9. केतु

ज्योतिषनुसार केतुला सर्पाचे धड मानले गेले आहे. याचा सरळ अर्थ आहे की डोक नसल्यास काहीही दिसणार नाही, म्हणजेच काय करावे, आणि काय करू नये असे होणार. याच कारणामुळे केतू दोष असलेली व्यक्ती नेहमी भ्रमाने पीडित होते. ज्यामुळे त्यास खुप समस्यांना तोंड द्यावे लागते. केतुच्या दुष्प्रभावापासून वाचण्यासाठी सर्वप्रथम ज्येष्ठांची सेवा करण्यास सुरूवात करा. सोबत केतुच्या या मंत्राचा जप करा.

ॐ कें केतवे नम:।

पलाशपुष्पसंकाशं तारकाग्रहमस्तकम।

रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम॥

डिस्क्लेमर
’या लेखातील कोणतीही माहिती/साहित्य/गणनेतील अचूकता किंवा विश्वसनीयतेची गॅरंटी नाही. विविध माध्यमे/ज्योतिषी/पंचांग/प्रवचने/मान्यता/धर्मग्रंथांतून संग्रहित करून ही माहिती आपल्यापर्यंत पोहचवली आहे. आमचा उद्देश केवळ माहिती पोहचवणे आहे, याचा उपयोग करणार्‍यांनी केवळ माहिती म्हणून घ्यावे. तसेच यापेक्षा याच्या कोणत्याही उपयोगाची जबाबदारी स्वत: उपयोगकर्त्याची राहील.