Shani Vakri 2021 : ‘या’ दिवसापासून शनी होणार वक्री, जाणून घ्या तुमच्या राशीवर काय होणार परिणाम

Shani Vakri 2021 : ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाला देवाची संज्ञा देण्यात आली आहे. शनी एक महत्वाचा ग्रह आहे. पंचांगनुसार, शनी ग्रह 23 मे 2021 रविवारी दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी मार्गी ते वक्री होईल. याचा अर्थ हा आहे की, शनी या दिवशी उलट मार्गक्रमण करेल. शनीच्या उलट्या मार्गक्रमाणाचा परिणाम सर्व राशींवर शुभ-अशुभ होऊ शकतो. शनी वक्री झाल्याने कोणत्या राशींवर कोणता परिणाम होणार ते जाणून घेवूयात…

मेष
या राशीच्या जातकांना आर्थिक लाभ होईल. उत्पन्नासह खर्च वाढेल. नव्या व्यापारात संकट येऊ शकते.

वृषभ
आर्थिक बाजूने संमिश्र परिणाम मिळतील. अचानक परदेश प्रवास होऊ शकतो. ज्येष्ठांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

मिथुन
कार्यक्षेत्रात जास्त आव्हानांचा सामना करावा लागेल. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. वाणीचर संयम ठेवा. मित्रांशी वाद होऊ शकतो.

कर्क
भागीदारीतील वाद संपेल. बेकायदेशीर कामांपासून दूर रहा, अन्यथा कायदेशीर प्रकरणात अडकू शकता.

सिंह
पैसा गुंतवताना संयम ठेवा, नुकसान होऊ शकते. शत्रुंचा सामना करावा लागेल. पैशाची कमरता जाणवेल.

कन्या
मुलांबात समस्यांचा सामना करावा लागेल. उत्पन्नसुद्धा कमी होऊ शकते. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सन्मान करावा.

तुळ
धर्म आणि अध्यात्मात रुची वाढेल. कार्यक्षेत्रात वाद वाढू शकतो. पैसा कमावण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. निर्णय घेताना सावधगिरी बाळगा.

वृश्चिक
पैसा खर्च होईल, ज्यामुळे बचत कमी होईल. घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीकडे लक्ष द्या.

धनु
उपजिविकेसाठी घरापासून दूर जावे लागेल. तब्येतीबाबत तणावाचा सामना करावा लागू शकतो.

मकर
आरोग्याकडे लक्ष द्या. तब्येतीबाबत तणाव होऊ शकतो. कमावलेला पैसा कमी होऊ शकतो. निर्णय विचारपूर्वक घ्या.

कुंभ
गुंतवणुकीचा निर्णय योग्य ठरणार नाही. आरोग्याच्या बाबतीत सावध रहा. परदेश प्रवास टाळा. अचानक धनलाभ होईल.

मीन
समाजात सन्मान प्राप्त होईल. अडकलेला पैसा परत मिळेल. परदेशात कुणी मित्र असेल तर त्याच्याकडून लाभ मिळेल.