Shanishchar Stotra : जेव्हा शनीदेवाचा संहार करण्यासाठी गेले राजा दशरथ, 3 वरदान घेऊन परतले अयोध्येत

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   पौराणिक कथेनुसार, एकदा राजा दशरथ ज्योतिषाचार्यांसोबत बसले होते. ज्योतिषांनी सांगितले की, शनीदेव कृत्तिका नक्षत्राच्या शेवटी आहेत आणि रोहिणी नक्षत्र भेदून जाणार आहेत. ज्याचे फळ देव आणि दानवांसाठी खुप भयंकर असेल. तसेच पृथवीवर 12 वर्षांसाठी दुष्काळ पडेल. हे ऐकून राजा दशरथ चिंताग्रस्त झाले. त्यांनी वशिष्ठांसोबत अन्य महर्षींना यावर मार्ग विचारला. त्या सर्वांनी म्हटले की, याचे उत्तर तर स्वत: ब्रह्मदेवांकडे सुद्धा नाही.

यानंतर राजा दशरथ आपल्या दिव्य रथावर स्वार झाले आणि सूर्यलोक ओलांडून नक्षत्र मंडळात पोहचले. तेथे रोहिणी नक्षत्राच्या मागच्या बाजूला जाऊन शनीदेवावर दिव्यास्त्र सोडण्यासाठी त्यांनी धनुष्यावर बाण चढवला. हे पाहून शनीदेव काही क्षणासाठी घाबरले, परंतु नंतर हसत म्हणाले, राजा! तुमचे धाडस प्रशंसनीय आहे. शनीच्या नेत्रांमुळे देव-दैत्य सर्व भस्म होतात, परंतु आम्ही तुमच्या धाडसाने प्रसन्न झालो आहोत. तुमची जी इच्छा असेल, तो वर मागा. तेव्हा राजा दशरथाने म्हटले, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत, तोपर्यंत तुम्ही रोहिणी नक्षत्र भेदू नये. यावर शनीदेवाने म्हटले तथास्तू.

शनीदेव राजा दशरथाला म्हणाले, मी अतिप्रसन्न आहे, आणखी एक वर मागा. तेव्हा त्यांनी म्हटले की, 12 वर्षापर्यंत कधीही दुष्काळ पडू नये. तेव्हा राजा दशरथाने धनुष्य रथावर ठेवले आणि शनीदेवाची सुस्ती करू लागले. ही स्तुती शनैश्वर स्तोत्रम म्हणून ओळखली जाते.

त्यांच्या तोंडून आपले स्तोत्र ऐकुन शनीदेवाने आणखी एक वर मागण्यास सांगितले. तेव्हा राजा दशरथाने म्हटले, तुम्ही कधीही कुणाला पीडा देऊ नये. यावर शनीदेव म्हणाले की, हे शक्य नाही. जीवांना कर्मानुसार सुख आणि दुख भोगावे लागते. होय, मी हे वरदान देतो की, तुम्ही जी माझी स्तुती केली आहे, ती कुणी वाचली, तर त्यास पीडामुक्ती मिळेल. अशाप्रकारे राजा दशरथ शनीदेवाकडून तीन वरदान घेऊन आयोध्येत परतले.