धनत्रयोदशीला करा भगवान धन्वंतरीची पूजा, आपल्या राशीनुसार करा खरेदी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   2020 ची दिवाळी 12 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. हा 5 दिवसांचा उत्सव आहे. यानंतर 13 नोव्हेंबरला धनत्रयोदशीचा सण येईल. या वर्षी पंचांगानुसार 13 तारखेलासुद्धा त्रयोदशीची तिथी राहील.

धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी आणि यमराजाची विशेष पूजा केली जाते. या दिवशी आपल्या राशीनुसार पूजा करण्याची परंपरा आहे. राशीनुसार खरेदीसुद्धा केली जाऊ शकते.

धर्मानुसार, देव-देवतांनी आणि दानवांनी समुद्र मंथन केले होते. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीवर मंथनातून भगवान धन्वंतरी प्रकट झाले होते. ते अमृत कलशासह प्रकट झाले होते. असे म्हटले जाते की, भगवान धन्वंतरी आयुर्वेदाचे देवता आहेत. त्यांची पूजा चांगल्या आरोग्यासाठी केली जाते. ज्या दिवशी धनत्रयोदशी पूजा केली जाते, त्यादिवशी यमराजांचीसुद्धा पूजा केली जाते. यामुळे भय दूर होते. या दिवशी केलेल्या खरेदीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी जर व्यक्तीने राशीनुसार खरेदी केली तर हे अतिशय शुभ मानले जाते. धनत्रयोदशीला राशीनुसार कोण-कोणत्या वस्तू खरेदी केल्या जाऊ शकतात, ते जाणून घेऊयात.

मेष –

सोने, चांदी, भांडी, दागिने, हिरे, वस्त्र इत्यादी वस्तू खरेदी करणे खूप शुभ असते.

वृषभ –

सोने, चांदी, पितळ, कांस्य, हिरे, काॅम्प्युटर, भांडी, केसर, चंदन इत्यादी वस्तू खरेदी करणे या दिवशी खूप शुभ असते.

मिथुन –

जमीन, घर, प्लॉट, प्रवाळ, सोने, चांदी इत्यादी वस्तू खरेदी करणे या दिवशी खूप शुभ मानले जाते.

कर्क –

सोने, चांदी, वाहन, दागिने आणि जुन्या वस्तू खरेदी करणे शुभ आहे.

सिंह –

वाहन, विजेची उपकरणे, सोने, चांदी, तांबे, पितळ, भांडी, लाकडाचे सामान इत्यादी वस्तू खरेदी करणे या दिवशी खूप शुभ मानले जाते.

कन्या –

जमीन, घर इत्यादी वस्तू खरेदी करणे या दिवशी खूप शुभ मानले जाते. चांदी खरेदी करणे टाळा.

तूळ –

या राशीचे लोक समाधानी राहावेत आणि गुंतवणूक टाळावी. जे खरेदी करायचे असेल ते घरातील इतर सदस्यांच्या नावाने खरेदी करा.

वृश्चिक –

सोने, चांदी, भांडी, पितळ, वस्त्र, लोखंड इत्यादी वस्तू खरेदी या दिवशी शुभ असते.

धनू

जमीन-मालमत्ता खरेदीने विशेष लाभ होऊ शकतो. जर या दिवशी व्यक्तीने मौल्यवान धातू खरेदी केल्यास लाभ मिळतो.

मकर –

प्रत्येक प्रकारची वस्तू खरेदी करता येईल. हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. कपडे आणि सोने खरेदी अतिशय शुभ आहे.

कुंभ

पुस्तके, वाहन, इलेक्ट्रॉनिक्स, लाकडी फर्निचर आणि घर सजावटीच्या वस्तू खरेदी करणे शुभ आहे.

वृश्चिक –

या राशीवाल्यांना भेट किंवा सन्मानाचा लाभ मिळेल.

मीन –

सोने-चांदी, रत्न इत्यादी खरेदी करणे शुभ आहे. कपडे आणि दागिने खरेदी करू शकता.