बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज कालवश

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – संत सेवालाल महाराजांचे वंशज तथा बंजारा समाजाचे धर्मगुरु डॉ. रामराव महाराज यांचे मुंबईत शुक्रवारी (दि. 30) रात्री 11 वाजताच्या सुमारास निधन (religious-leader-banjara-community-dr-ramrao-maharaj-passed-away) झाले. ते 1948 मध्ये पोहरादेवी संत सेवालाल महाराज संस्थानच्या गादीवर बसले होते.

डॉ. रामराव महाराज यांची प्रकृती गेल्या वर्षभरापासून अस्थिर होती. त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु होते. काही महिन्यांपूर्वी श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचारही करण्यात आले. गेल्या काही दिवसांपूर्वी ते मुंबई येथे गेले होते. त्यात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी शुक्रवार (दि. 30) रात्री 11 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यावेळी त्यांच्यासोबत महंत शेखर महाराज होते.

सोमवारी पोहरादेवीत अंत्यसंस्कार
डॉ. रामराव महाराज यांच्याविषयी बंजारा समाजात अपार श्रद्धा असून, त्यांच्या पार्थिवावर सोमवारी पोहरादेवी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या परिवाराकडून सांगण्यात आले आहे.