काय सांगता ! होय, रेमडेसिवीरचा चक्क OLX वर देखील काळाबाजार, मुंबईतील व्यक्तीकडून विक्री

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे अनेक राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत असतानाच आता चक्क OLX वरून रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. अंधेरी, मुंबई येथील व्यक्तीकडून इंजेक्शनची विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे रेमडेसिवीरला ओएलएक्सवर विकण्यास परवानगी नाही.

OLX वर रेमडेसिवीर इंजेक्शन विक्रीच्या जाहिराती दिसून आल्या. महाराष्ट्र आणि गुजरातमधील व्यक्तींकडून याची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे इंजेक्शन काहीजण 5 ते 6 रुपयांना विकत आहेत. अंधेरीतील एका व्यक्तीने OLX वर रेमडेसिवीर विक्रीची जाहिरात पोस्ट केलेली होती. त्या व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रय़त्न झाला. मात्र त्याच्याशी तर दुसरी व्यक्ती गुजरातमधील आहे. सत्यम असे खातेधारकाचे नाव असून त्याने रेमडेसिवीर इंजेक्शन विक्रीस असल्याची पोस्ट केली आहे. या इंजेक्शनची किंमत 1400 ते 1600 रुपये इतकी आहे. रुग्णसंख्येत वाढ झाल्यानंतर महाराष्ट्रातही रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला. मागणी वाढताच इंजेक्शनचा अनेक ठिकाणी काळाबाजार सुरु झाला. त्यामुळे औषध प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने अनेक ठिकाणी कारवाया केल्या आणि रेमडेसिवीर जप्त केले होते. मात्र काळाबाजार अद्यापही थांबल्याचे अद्यापही थांबला नसल्याचे दिसत आहे.