‘कंबरदुखी’ने बेजार झालात, ‘हे’ 6 उपाय करा आणि ‘वेदनामुक्त’ व्हा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : पाठदुखी आणि कंबरदकुखीचे प्रमाण महिलांमध्ये जास्त आढळून येते. मात्र, अलिकडे ही समस्या सर्वांमध्ये वाढली आहे. कारण कामाच्या ठिकाणी अनेकतास एकाच पोझिशनमध्ये बसावे लागते. शिवाय शरीराची हालचाल आणि व्यायामाचा अभाव यासह अनेक कारणे या पाठीमागे आहेत. पाठ आणि कंबर दुखीकडे दुर्लक्ष केल्यास मणक्यांचा त्रास उद्भवून शस्त्रक्रियेपर्यंत प्रकरण जाऊ शकते. कंबर आणि पाठ दुखण्याची कारणं जाणून घेतली तर ही समस्या सहज दूर करता येऊ शकते.

ही आहेत कारणे
1 आठ-नऊ तास एकाच जागी बसल्यामुळे पार्श्वभाग किंवा कंबर आणि पाठ त्यांच्यात वेदना होतात. हे दुखणे अनेक दिवस तसंच राहिल्यामुळे मोठा आजार होण्याची शक्यता असते.

2 तासनतास एकाच जागी बसून राहील्यामुळे पाठीचे आणि कमरेचे दुखणे जाणवते.

3 व्यायामाचा अभाव, खाण्यापिण्यात ताळमेळ नसणे.

4 शरीरातील पोषक घटकांची कमतरता यांमुळे कंबर आणि पाठ दुखीचा त्रास सर्वाधिक सहन करावा लागतो.

5 प्रवासात जास्तवेळ बसून राहत असाल तर ही समस्या जाणवते.

हे उपाय करा
1 चालताना किंवा बसताना पाठ सरळ राहील अशा स्थितीत बसा.

2 एकाचजागी बसून जास्त वेळ काम करत असाल तर ताठ बसणे गरजेचे आहे.

3 ऑफिसमध्ये काम करत असताना अधून-मधून चालण्याची सवय ठेवा. ब्रेकच्या वेळेत चालू शकता.

4 कंबर आणि पाठीचे दुखणे असलेल्या लोकांनी आहारात विटामीन डी3, सी, आणि कॅल्शियम तसंच फॉस्फरस आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा.

5 आहारात माशांचा समावेश करा. यामुळे हाडे मजबूत होऊन कंबर, पाठ दुखण्यापासून आराम मिळू शकतो

6 आहारात डिंकाचे लाडू किंवा डिंकाचा समावेश करा.