पांढऱ्या केसांनी त्रस्त आहात ? जाणून घ्या काय करावं अन् काय नको !

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  केस पांढरे होण्याची अनेक कारणं आहेत. त्यामुळं जेव्हा केसं पांढरे होऊ लागले असतील किंवा झाले असतील तर त्यांची कशा प्रकारे काळजी घ्यावी याची माहिती आपण घेणार आहोत. केसांना पुन्हा एकदा काळा रंग कसा मिळवायचा हेही जाणून घेणार आहोत.

ही घ्या काळजी –
1) जर 1-2 केसं पांढरे झाले असतील तर ते केस तोडू नका. असं केलं तर इतर काळे केसंही पांढरे होऊ लागतात.

2) थोडेच केस पांढरे झाले असतील तर डाय करू नका. त्यामुळं काळ्या केसांवरही परिणाम होतो. यामुळं केस वेगानं पांढरे होऊ लागतात.

3) आठवड्यातून 2 वेळा केस स्वच्छ धुवावेत.

4) संतुलित आहार घेण्यावर भर द्यावा.

5) केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.

6) केस धुण्यासाठी आवळा, रिठा, शिकेकाई, बेसन, दही इ.चा वापर करावा.

7) खूप गोड पदार्थ, तेलकट किंवा मसालेदार जेवण, दारू, अंमली पदार्थ यांचं सेवन करू नका.

8) केसांमध्ये हेअर स्प्रे व केस वाळवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर कमी कमी प्रमाणात करावा.

9) पुरेशी झोप घ्या.

10) नियमित व्यायाम करा.

11) आहारात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा.

12) पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य यांचं सेवन आवर्जून करा.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.