मुंबई हायकार्टाकडून रेमडेसिवीरच्या कमतरतेची दखल, राज्याला फटकारलं अन् केंद्राला पाठवली नोटीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात रेमडेसिवीर इंजेकशनच्या तुटवड्याबाबत आता मुंबई हाय कोर्टाने दखल घेतली आहे. तर याबाबत नागपूर खंडपीठाने, राज्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन कोणत्या आधारे वाटले जात आहे? असा प्रश्न केंद्राला केला आहे. तर, देशाची तुलना पाहता एकट्या महाराष्ट्र राज्यात ४० टक्क्यांहून जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे त्यांना रेमडेसिवीर इंजेकशनही त्याच प्रमाणात मिळायला हवे, असे कोर्टाने सांगितले आहे.

या प्रकरणावररून मुंबई हाय कोर्टाने महाराष्ट्र सरकारलाही फटकारले आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यांना योग्य पद्धतीने रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप होत नाही, महाराष्ट्र सरकारने १३ एप्रिल आणि १८ एप्रिलला नागपूरात रेमडेसिवीरची एकही कुपी का पाठवण्यात आली नाही? असा प्रश्न कोर्टने केलाय. तसेच, आम्ही फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या जॉइंट डायरेक्टरसोबत बैठक केली. त्यांनी सांगितले, की राज्य पातळीवर एक समिती आहे. ही समिती राज्यांसाठी कुप्यांची संख्या निश्चित करते. सध्या ७ कंपन्या देशात रेमेडेसिविर औषधाचा पुरवठा करत आहेत. परिस्थिती बघता, जेथे कोरोना रुग्णांची संख्या जास्तआहे, अशा शहरांना कंपन्यांनी अधिक रेमडेसिवीर इंजेक्शन द्यायला हव्या. यात नागपूरचाही समावेश आहे. यासाठी सरकार कंपन्यांना निर्देश देऊ शकते. असे न्यायालयाचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र राज्यात दर ३ मिनिटाला एका कोरोना बाधिताचा मृत्यू –

महाराष्ट्र राज्यात दर तासाला जवळपास २ हजार ८५९ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर प्रत्येक ३ मिनिटांना एकाचा मृत्यू होत आहे. इतकेच नाही, तर राज्यातील एकूण मृतांचा आकडाही ६० हजारच्या वर गेला आहे. मागील २४ तासांत येथे ५०३ जणांचा मृत्यू झाला आहे. खालील आकडेवारीनुसार महाराष्ट्रात कोरोनाची संख्या अधिक आहे.

महाराष्ट्र –  ६८,६३१

टर्की –  ५५,८०२

अमेरिका –  ४३,१७४

ब्राझील –  ४२,९०७

फ्रान्स –  २९,३४४