संजय राऊतांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर, म्हणाले – ‘अहो, शिवसेनेमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली हे लक्षात ठेवा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) कारभारावरुन शिवसेनेवर (shiv sena) टीका केली होती. मुंबईत म्हातारीचा बुट ब्रिटिशांनी केला, राणीचा बाग ब्रिटिशांनी तयार केला. ब्रिटिशांनीच (British) सगळं केलं. मग शिवसेनेनं मुंबईत काय केलं? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला होता. याला शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अहो, शिवसेनेमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली हे लक्षात ठेवा, असा टोला राऊतांनी लगावला आहे. ब्रिटिशांच्या कामांची आठवण करून देता ना, मग सध्या संसद भवनही ब्रिटिशांच्याच काळात झाले आहे. मुंबईसाठी शिवसेनेच्या योगदानाची लांब यादी देता येईल. रस्ते, पाण्यापासून स्थानिकांना रोजगारापर्यंतची अनेक कामे शिवसेनेने केली असल्याचे राऊत Sanjay Raut म्हणाले.

संजय राऊत Sanjay Raut म्हणाले की.
शिवसेनेने मुंबई महाराष्ट्रात ठेवली अन् मुंबईवर मराठी माणसाचा पगडा कायम ठेवला.
चंद्रकांत पाटलांचे ब्रिटिशांवर फारच प्रेम दिसते.
त्यांना जाऊन बराच काळ उलटला आहे.
शिवसेनेने मुंबईसाठी काय केले, हे जरा महाराष्ट्रात जाऊन जनतेला विचारा.
वाटल्यास या विषयावर सार्वमत घ्या.
संयुक्त महाराष्ट्रानंतर मुंबई केंद्रशासित प्रदेश होणार वा महाराष्ट्राच्या हातून निसटणार अशी स्थिती निर्माण झाली होती.
पण शिवसेनेने बाणेदारपणे मुंबई महाराष्ट्रात (Mumbai Maharashtra) ठेवली.
त्यामुळे तुमच्यासारखी माणसे मुंबईत येऊन आज जाहीरपणे बोलू शकतात.
शिवसेना नसती तर तेही शक्य झाले नसते, असा टोला राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

संजय राऊतांचा भाजपवर निशाणा; म्हणाले – ‘चंद्रकांत पाटलांना फार गांभीर्याने घेऊ नका’

चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत छत्रीचे वाटप

…म्हणून शरद पवार यांनी केलं शिवसेनेचं कौतुक

दुर्दैवी ! शेतात बैलगाडी उलटल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू, लातूर जिल्ह्यातील घटना

महंत नरसिंहानंद यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, म्हणाले – ‘कोरोना मोठं षडयंत्र, मुस्लिमांची वाढती लोकसंख्या विनाशाचे कारण, प्रत्येक हिंदूने 5-6 मुलांना जन्म द्यावा’

परमबीर सिंहांना सुप्रीम झटका ! महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, नेमकं काय म्हणालं SC हे जाणून घ्या

Thane News | ठाणे पोलिसांची कारवाई ! शेकडो कोटींच्या युएलसी घोटाळा प्रकरणी तिघांना अटक; मुख्य संशयित घेवारे अद्यापही फरारच

Wab Title :- remember mumbai remained maharashtra because shiv sena sanjay raut slammed chandrakant patil