मोदींचे भाषण ऐकण्यापूर्वी ‘ही’ सूचना लक्षात ठेवा – धनंजय मुंढे 

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीला काही दिवस अवकाश राहिला असताना निवडणुकीचे रन चांगलेच तापू लागले आहे. भाजपला सत्तेतून बाहेर फेकण्यासाठी राष्ट्रवादीने चांगलीच कंबर कसायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी आज ‘निर्धार परिवर्तनाचा यात्रा’ या राज्यव्यापी मोहीमेची तळकोकणातून सुरुवात करणार आहे. या यात्रेसाठी राष्ट्रवादीने जोरदार शक्ती प्रदर्शन केले असून रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करून आणि चवदार तळ्यावर बाबासाहेब आंबेकरांना अभिवादन करून या यात्रेची सुरुवात केली जाणार आहे .
दरम्यान निर्धार परिवर्तनाची आजची दुसरी सभा होती यावेळी बोलताना धनंजय मुंढे म्हणाले कि मोदी सरकार ने केंद्रातून भारताला आणि फडणवीस सरकारने राज्यात लोकांची फसवणूक केली आहे , आज जर लोकसभा निवडणूक जवळ आल्या नसत्या तर पेट्रोल ने केव्हाच शंभरी गाठली असती. , चार वर्ष ७ महिन्यांपासून एक लिटर पेट्रोल मागे मोदी सरकार तुमच्याकडून ३१ रुपये घेत आहे असं ही यावेळी मुंढे म्हणाले
 राष्ट्रवादीने हा निर्धार केला आहे कि येणाऱ्या दोन्ही निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचं म्हणजेच जनतेचं सरकार आणायचं आणि जनतेला फसवणारं सरकार घरी घालवायचं. असं आवाहन धनंजय मुंढे यांनी खेड तालुका रत्नागिरी येथे बोलताना केलं आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us