चांगला फिटनेस-एनर्जी असूनही हार्ट अटॅकचा धोका का वाढतो ?, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – नृत्यदिग्दर्शक आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूझा यांना नुकताच हृदयविकाराच्या झटक्यानंतर मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मीडिया रिपोर्टनुसार, रेमोच्या हृदयातून ब्लॉकेजेस काढून आयसीयूमध्ये ठेवले आहे. ४६ वर्षात एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येणे सामान्य गोष्ट नाही.

रिॲलिटी शोमध्ये बर्‍याचदा पाहिलेला रेमो फिट दिसतो. नृत्य करताना त्याची ऊर्जा पातळी देखील खूप जास्त असते. अशा तंदुरुस्त व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येणे यावर विश्वास ठेवणे देखील कठीण आहे. डॉक्टर म्हणतात, की एखाद्या व्यक्तीस अनेक कारणांमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

१) धूम्रपान
मायो क्लीनिकच्या अहवालानुसार तंबाखू किंवा धूम्रपान सेवन करणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त असतो. दीर्घकाळ धूम्रपान करणे किंवा सेकंड हॅण्ड धूम्रपान करणे हे देखील कारण असू शकते. म्हणून जे बीडी-सिगारेटचे सेवन करतात त्यांच्यापासून आपण दूर राहिले पाहिजे.

२) उच्च रक्तदाब
उच्च रक्तदाब वेळेवर हृदयावर नियंत्रण ठेवणाऱ्या रक्तवाहिन्या खराब करू शकतात. बहुतेकदा लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहांमुळे लोकांमध्ये उच्च रक्तदाब देखील वाढतो. म्हणून आपण या सर्व गोष्टींबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे.

३) लठ्ठपणा
रक्तातील कोलेस्ट्रॉल पातळी, उच्च ट्रिगलीसेराइड पातळी, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा लठ्ठपणाशी थेट संबंध आहे. तज्ज्ञ म्हणतात, की शरीराचे वाढते वजन नियंत्रित करून हा धोका टाळता येतो.

४) मधुमेह
शरीरात स्वादुपिंड व्यवस्थित काम न केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. यामुळे रक्तदाब संतुलित ठेवण्यासाठी एक विशेष हार्मोन देखील तयार होणे थांबते. यामुळे एखादी व्यक्ती रक्तदाबाची शिकार बनू शकते.

५) अनुवांशिक
तज्ज्ञ म्हणतात, की अनुवंशिक कारणांमुळे बरेच लोक हृदयविकाराचा बळी देखील बनू शकतात. ज्यांच्या कुटुंबात भावंडांमध्ये किंवा वडिलांना अशी समस्या आहे त्यांनी विशेष काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे. पुरुषांमध्ये ५५ आणि महिलांमध्ये ६५ व्या वर्षी धोका वाढतो.

६) ताणतणाव
डॉक्टर म्हणतात, की जास्त ताणामुळे किंवा मानसिक ताणामुळे एखादी व्यक्ती हृदयविकाराचा शिकार बनू शकते. हे टाळण्यासाठी नियमित व्यायाम करा आणि चांगला आहार घ्या.