Remo D’Souza | रेमो डिसूझाच्या कुटुंबातील सदस्याची आत्महत्या, संपूर्ण कुटुंबला मोठा धक्का

पोलीसनामा ऑनलाइन टीम   – Remo D’Souza | प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि फिल्ममेकर रेमो डिसूझा ( Remo D’Souza ) यांचा मेहुणा जेसन वॅटकिन्सने (Jason Watkins) आत्महत्या केली. जेसन वॅटकिन्सचा मृतदेह मुंबईतील मिल्लत नगर येथील त्याच्या घरी आढळून आला. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. जेसन हा रेमा डिसूझाची पत्नी लिझेल (Lizelle Remo D’Souza) हिचा भाऊ होता.

प्रकरणाची पुष्टी करताना पोलिसांनी सांगितले की, जेसन वॅटकिन्सचा मृतदेह त्याच्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी सांगितले की, मृतदेह विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून जेसनची तब्येत बिघडल्याचे समजते. नैराश्य हे त्याच्या आत्महत्येचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.

 

यावर रेमोच्या ( Remo D’Souza ) बाजूने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. लिझेलनेही याबाबत थेट कोणतीही माहिती दिलेली नाही, मात्र तिने तिच्या भावाचे काही फोटो शेअर केले असून अतिशय भावूक गोष्टी लिहिल्या आहेत.

 

 

 

File photo

रेमो डिसूजाची पत्नी लिझेल रेमो डिसूझा हिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. तिचा भाऊ आता या जगात नाही, असे पोस्ट करताना तिने लिहिले आहे. भाऊ जेसनचे फोटो शेअर करत तिने लिहिले- ‘का? तू माझ्यासोबत असं का केलंस? मी तुला कधीच माफ करणार नाही.’ (Lizelle Remo D’Souza’s Brother’s Suicide )

Web Title : Remo D’Souza | jason watkins brother in law of remo dsouza committed suicide by hanging himself

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rajesh Tope | राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

Pooja Hegde Instagram | कडाक्याच्या थंडीत पूजा हेगडेने चढवला इंटरनेटचा पारा, बिकिनी फोटोंमुळे चाहते झाले घायाळ

LIC Kanyadan Policy | LIC च्या कन्यादान पॉलिसीत दररोजच्या गुंतवणुकीवर मिळेल मोठी रक्कम, मिळू शकतात जवळपास 27 लाख

Eknath Khadse | जळगावच्या बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा; एकनाथ खडसेंना धक्का

12 BJP MLAs Suspension | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय
सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून, ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे