कलम 370 रद्द करणं ऐतिहासिक पाऊल, ‘आर्मी डे’निमित्त लष्कर प्रमुखांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दहशतवादाविरोधात आमची झिरो टॉलरंसची धोरणं कायम राहतील. कोणत्या संभाव्य हल्ल्यावर आमची नजर आहे. आर्टीकल 370 हटवल्यानंतर शेजारील देशांकडून छेडल्या जाणाऱ्या युद्धाला पूर्णविराम मिळाला आहे असं वक्तव्य लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी केलं आहे. 72 व्या आर्मी डेच्या निमित्ताने ते दिल्लीतील करियप्पा परेड ग्राऊंडवरील कार्यक्रमात ते बोलत होते.

लष्कराला प्रोत्साहन देताना जरनल नरवणे म्हणाले, “आपण कोणत्याही धोक्याचा सामना करण्यासाठी तयार आहे. भारतीय लष्कर केवळ लढाऊ संघटना किंवा राष्ट्रशक्तीचं साधन नाही. भारतीय लष्कराची देशात खास जागा आहे. सध्या सीमेवर शांतीपूर्ण स्थिती आहे.” असंही ते म्हणाले.

पुढे बोलताना नरवणे म्हणाले, “आपलं लष्कर बॉर्डर मेकॅनिजमवर काम करत आहे. लवकरच यावर योग्य पावलं टाकली जातील. एलओसीवर जी स्थिती आहे ती जम्मू काश्मीरशी निगडीत आहे. आर्टीकल 370 हटवणं हे एक ऐतिहासिक पाऊल आहे.” असंही त्यांनी सांगितलं.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like