शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण, आता भाजपने शिवसेनेवर साधला निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटकातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आला. या प्रकारामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना रंगू लागला आहे. सत्ताधाऱ्यांनी विरोधक असलेल्या भाजपवर जोरदार टीका केली. याच मुद्यावरून आता भाजपने सत्ताधारी शिवसेना आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे.


छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कर्नाटकातील मनगुत्ती येथे रातोरात हटवल्याच्या घटनेचा आम्ही जाहीर निषेधच करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सन्मानाने बसवलाच पाहिजे. मात्र पुतळा हटविण्यास जबाबदार असणाऱ्या काँग्रेसच्या स्थानिक आमदारांच्या विरोधात शिवसेना आंदोलन करणार का ? असा सवाल भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

दरम्यान, कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. महाराष्ट्रात देखील या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. तर मनगुत्ती गावात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान तहसीलदार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी, पंच मंडळी यांची बैठक पार पडली. यामध्ये आठ दिवसांत एकमेकांच्या सहमतीने तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like