छत्रपती संभाजी महाराजांचे बिडी उत्पादनाला दिलेले नाव हटवण्याची मागणी

जेजुरी : गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात साबळे वाघिरे व्यवसाय समूह छत्रपती संभाजी महाराजांचे नाव वापरून बिडी चे उत्पादन करत आहे. राष्ट्रपुरुषांचे नाव वापरून तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन बंद करावे या मागणी साठी शिवधर्म फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांनी पुरंदर किल्याच्या पायथ्याशी आमरण उपोषण सुरु केले होते. मात्र हे उपोषण आज माघारी घेऊन राज्यभर साखळी आंदोलन आयोजित करण्यात आले आहेत.

दि. 4 सप्टेंबर पासून शिवधर्म फाउंडेशन चे अध्यक्ष दिपक काटे, मच्छिन्द्र टिंगरे, रवी पडवळ, दिनेश ढगे, सागर पोमण, सुनील पालवे यांनी पुरंदर किल्याच्या पायथ्याशी आमरण उपोषण चालू केले होते. 8 सप्टेंबर रोजी पहाटे 1वाजता सासवड पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. त्यानंतर उपोषणकर्त्यांना जेजुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले.

आज पुरंदर तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन शासन स्तरावर पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. या शिवाय तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. यासाठी शासनाला सहकार्य करण्याची विनंती केली. यावर उपोषण कर्त्यांनी. साखळी आंदोलनाची घोषणा करून उपोषण मागे घेतलं. तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्या हसते ज्यूस देऊन उपोषण सोडले.

मात्र हे नाव जो पर्यंत हटत नाही तो पर्यंत महाराष्ट्रात साखळी आंदोलन करण्याचा इशारा शिवधर्म फाउंडेशन व इतर पाठिंबा देणाऱ्या संघटनांनी दिला आहे.
यात.
15 सप्टेंबर रोजी संभाजी बिडी या उत्पदानवर बहिष्कार…
22 सप्टेंबर रोजी साबळे वाघिरे कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा..
29 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व पक्षीय खासदार आमदार यांना घेराव,
आणि 6 ऑक्टोबर रोजी राज्यभर रास्ता रोको.
अशी साखळी आंदोलनाची घोषणा शिवधर्म फाउंडेशन च्या वतीने करण्यात आली आहे.