‘अर्धा’ डझन नव्हेतर ‘दीड’ डझन मंत्र्यांना काढायला हवं होतं : धनंजय मुंडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचे काम आज पूर्ण झाले आहे. विधीमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरु होत आहे. त्याच पार्श्वभूमिवर मंत्रिमंडळ विस्ताराचे काम भाजपने उरकून घेतले आहे. आज विरोधकांनी आधिवेशनासंबंधीत बैठक झाली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला घेरण्यासाठी रणनीती आखली आहे. मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत मंत्रिमंडळ विस्तारावर वक्तव्य केले आहे. त्यात

आज ६ मंत्र्यांना वगळले, मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सर्व दीड डझन मंत्र्यांना काढायला हवे होते, अशी मागणी धनंजय मुंडे यांच्यावर केली होती.

भ्रष्ट मंत्र्यांना राज्यातील जनता येत्या अधिवेशनात वगळल्याशिवाय राहणार नाहीत. ज्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे दिले त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे, असं मत मुंडेंनी यावेळी व्यक्त केले. तसेच प्रकाश मेहतांना डच्चू देऊन प्रश्न संपला असं होणार नाही. प्रकाश मेहतांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितलं. तसंच सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधक दुष्काळ, बेरोजगारी अशा विविध मुद्दयांवर आक्रमक होणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. त्यामुळे बेरोजगार भत्ता राज्यातील तरुणांना द्यावा अशी मागणी अधिवेशनात करणार आहोत. राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याचेही त्यांनी सांगितलं. २०१९-२०१९ पर्यंत राज्याची महसूल तूट ३५ हजार कोटींपर्यंत पोहचली आहे. राज्यात 5 वर्षात कसलाही विकास झाला नाही केवळ सरकार आभास निर्माण करते. फडणवीस यांचे हे अभासी सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, राज्यात दुष्चकाळ जन्य परिस्थिती आहे. राज्यात दुष्काळात आम्ही फिरलो, मात्र सरकारचे मंत्री कुठेच दिसले नाहीत. मुख्यमंत्री यांनी एसी कॅबिनमध्ये बसून दुष्काळाचा आढावा घेतला. तर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना परदेशवारी केल्यानंतर आता शेतकऱ्यांची आठवण आली आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

सिने जगत –

मुकेश अंबानींचा मुलगा आकाश, सून श्‍लोकाचे लग्‍नानंतरचे ‘रोमँटीक’ फोटो पहिल्यांदाच ‘सर्वांसमोर’, पहा सर्व फोटो

आजही ‘या’ अभिनेत्याला मुलं घालतात लग्‍नाची मागणी, येतात अश्‍लील मेसेज्स

‘त्या’ कपड्यांवर मलायका अरोरा पुन्हा एकदा हॉस्पीटल ‘समोर’च दिसली, चाहत्यांमध्ये ‘नरम-गरम’ चर्चा

‘या’ 4 ‘टॉप’ अभिनेत्रींनी केलं ‘डेटिंग’, मात्र अद्यापही आहेत अविवाहीत