Builder Avinash Bhosale News | प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले व त्यांचा मुलगा अमित यांना ED चे नव्याने समन्स; नोकरदारांच्या भुखंडावर उभारली व्यावसायिक इमारत

मुंबई (Mumbai news): पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Builder Avinash Bhosale News | काही दिवसांपूर्वीच ४० कोटी रुपयांची मालमत्ता जप्तीची कारवाई केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)(Enforcement Directorate) प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash bhosale) व त्यांचा मुलगा अमित भोसले (Amit bhosale) यांना नव्याने समन्स बजावले आहे. मनी लाँड्रिग प्रकरणात ही चौकशी करण्यात येत आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

ईडीने अविनाश भोसले यांना आज एजन्सीच्या कार्यालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. तर त्यांचा मुलगा अमित भोसले याला उद्या हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. ईडीने काही दिवसांपूर्वी अविनाश भोसले व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची ४०.३४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायदा १९९९ म्हणजेच फेमा अंतर्गत ही कारवाई केली गेली आहे. भोसले आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी फेमा कायद्याचे उल्लंघन करुन दुबईत स्थावर मालमत्ता संपादन केल्यावरुन ही कारवाई केली होती.

अविनाश भोसले यांची ‘एबीआयएल’ या रिअल इस्टेट कंपनीने नोकरशहांच्या घरांच्या बांधकामासाठी राखीव असलेला भूखंड खरेदी करुन त्यावर व्यावसायिक इमारत बांधून त्याची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. त्यावरुन ईडीने नव्याने गुन्हा दाखल करुन ही चौकशी सुरु केली आहे. या नव्या गुन्ह्यांमुळे अविनाश भोसले व त्यांचा मुलगा अमित भोसले यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : Enforcement Directorate (ED) summoned Pune-based businessman Avinash Bhosle and his son Amit Bhosle in connection with money laundering case. ED asked Avinash to appear before the agency today.

हे देखील वाचा

Pune Crime News | उच्चशिक्षीत विवाहीतेचा छळ ! पुण्यातील बड्या उद्योजक कुटुंबातील तिघांसह 8 जणांविरूध्द गुन्हा दाखल; पिडीतेचा उजवा कान पुर्णपणे झाला बहिरा

Maharashtra Monsoon | बळीराजांवर अस्मानी संकट ! राज्यात पुढील 10 दिवस पावसाची दांडी, हवामान खात्याचा अंदाज

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर यांच्या कारवर सोलापूरमध्ये दगडफेक, गोळ्या मारल्यातरी गप्प बसणार नाही, पडळकरांची प्रतिक्रिया

7th Pay Commission | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! 7 वा वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हप्ता ‘या’ महिन्यात मिळणार