पद्म पुरस्कारने सन्मानित प्रसिद्ध व्हायलिन वादक टीएन कृष्णन यांचे 92 व्या वर्षी निधन

चेन्नई : प्रसिद्ध व्हायलिन वादक त्रिपुनिथुरा नारायणायर (टीएन) कृष्णन यांचे सोमवारी सायंकाळी चेन्नईमध्ये निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. टीएन कृष्णन यांचा जन्म 1928मध्ये केरळमध्ये झाला होता. कृष्णन लहानपणापासूनच अफाट प्रतिभेचे धनी होते.

कृष्णन यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण त्यांचे वडिल ए नारायण अय्यर यांच्याकडून घेतले. त्यांनी तिरुवनंतपुरममध्ये 11 वर्षांच्या वयात 1939 मध्ये पहिल्यांदा कॉन्सर्टमध्ये आपली कला सादर केली होती. नंतर अल्लेप्पीचे पार्थसारथी त्यांचे मेंटर बनले आणि कृष्णन यांनी आपल्या करियरच्या सुरूवातीच्या दिवसात त्यांनी दिलेला सपोर्ट नेहमी स्वीकरला होता. 1942 मध्ये चेन्नईला जाण्याच्या दरम्यान ते सेमंगुड़ी श्रीनिवास अय्यर यांच्याशी जोडले गेले. यानंतर त्यांचे करियर नव्या उंचीवर पोहचले.

कृष्णन यांनी अरियाकुड़ी रामानुज अयंगर, मुसिरी सुब्रमनिया अय्यर, अलाथुर ब्रदर्स, जीएन बालासुब्रमण्यम, मदुरे मणि अय्यर, वैद्यनाथ भगवान, एमडी रामनाथन आणि महाराजपुरम विश्वनाथ अय्यर यासारख्या महान संगीतकारांसोबत काम केले होते.

पद्म विभूषणने सन्मानित
कृष्णन यांनी एक शिक्षक म्हणून उत्कृष्ट कार्य केले. ते म्यूझिक कॉलेज, चेन्नईमध्ये म्यूझिकचे प्रोफेसर होते. यानंतर ते दिल्ली युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ म्युझिक अँड फाईन आर्टचे डीन बनले. संगीत जगतात प्रोफेसर कृष्णन म्हणून ते ओळखले जात होते. त्यांना संगीत अकादमीचा संगीत कलानिधी आणि पद्म भूषण आणि पद्म विभूषणसह अनेक पुरस्कराने सन्मानित सुद्धा केले होते.

श्रीनिवास अय्यर यांचे शिष्य असलेले गायक आणि लेखक टी. एम. कृष्णा यांनी म्हटले की, त्यांना रागांचे सखोल ज्ञान होते. चांगल्या संगीताबाबत त्यांची स्पष्टता होती आणि त्यांना याचे अखंड पालन केले.