तुम्ही चौकीदार असाल तर महिला असुरक्षितच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष प्रचार आणि  प्रसारामध्ये सक्रिय झाले आहेत. ‘चौकीदार चौर हैं’ ला प्रत्युत्तर म्हणून ‘मैं भी चौकीदार’ अशी मोहीम भाजपने सुरू केली आहे. या मोहिमेला माजी केंद्रीय मंत्री एम.जे.अकबर यांनी देखील पाठिंबा दिला. मात्र अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी यावरून एम.जे.अकबर यांच्यावर चांगलीच टीका केली आहे. तुम्ही चौकीदार असाल तर महिला असुरक्षितच असा टोला त्यांनी लगावला आहे.
२०१८ मध्ये सुरू झालेल्या #metoo मोहिमेअर्तंगत अनेक पत्रकार महिलांनी एम. जे अकबर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले होते. एम. जे अकबर यांना या आरोपांमुळे ऑक्टोबर २०१८ रोजी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मै भी चौकीदार या मोहिमेला पाठिंबा देताना मला अभिमान वाटत आहे. भारताचा नागरिक म्हणून मी देशांतील भ्रष्ट्राचार, दहशतवाद, गरिबी दूर करण्यासाठी आणि एक नवा भारत घडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असेल’ असं ट्विट करत एम. जे अकबर यांनी या मोहिमेला पाठिंबा दर्शवला.
 या ट्विटनंतर अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी एम. जे अकबर यांच्यावर टीका केली आहे. रेणुका शहाणे यांनी एम. जे अकबर यांच ट्विट रिट्विट करत तुम्ही चौकीदार असाल तर महिला असुरक्षितच असतील असं म्हणत टीका केली आहे.
https://twitter.com/renukash/status/1106955558312206336
रेणुका शहाणे  म्हणाल्या की , ‘अगर आप चौकीदार है तो  कोई महिला सुरक्षीत नही. ‘ त्यांनी सोबत #BesharmiKiHadd असा हॅशटॅगही दिला आहे. एम.जे.अकबर यांच्यावर पत्रकार प्रिया रमाणी पल्लवी गोगोई यांच्या सह 20 महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे व बलात्काराचे आरोप लावले होते. त्यानंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.