आझम खान यांच्या वक्तव्यावर रेणूका शाहणे संतापल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते प्रचार सभेत उतावळे होऊन काहीही दावे आणि वक्तव्य करत असतात. असंच रामपूरमधून लोकसभेची निवडणूक लढवणारे समाजवादी पार्टीचे उमेदवार आझम खान यांनी भाजपा उमेदवार जया प्रदा यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावरून अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी संताप व्यक्त केला आहे. महिलांबाबत असे वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला निवडणुकीचे तिकीट दिले जाऊ नये, असं म्हणत शहाने यांनी त्यांचा संताप व्यक्त केला आहे.

रामपूरमधून आझम खान यांच्या विरोधात जया प्रदा निवडणूक लढवत आहेत. प्रचारादरम्यान, आझम खान यांनी भाषण करताना आपल्या मर्यादा सोडून अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरत जया प्रदा यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तारांवरून टीका करण्यात आली. तसच त्यांच्या वक्तव्याबद्दल त्यांच्या विरोधात एफआयआरही दाखल करण्यात आली.

महिलांचा आदर न राखता त्यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आझम खान सारख्या व्यक्तींना निवडणुकीचं तिकीट देता कामा नये. आझम खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मात्र केवळ एफआयआर दाखल करुन चालणार नाही. प्रत्यक्षात कारवाईदेखील करणं गरजेचं आहे. ही कारवाई नक्की होईल का ? मुळात त्यांना २०१९ ची लोकसभा निवडणूक लढविण्याची परवानगीच देता कामा नये, असं ट्विट रेणुका शहाणेंनी केले आहे. तसंच या ट्वीटमध्ये त्यांनी समाजवादी पक्षाचेअ अध्यक्ष अखिलेश यादव यांना टॅग केले आहे.

जाहीर सभेत टीका करुनही आझम खान यांनी पलटी मारली आहे, आपण जया प्रदा यांच्याबद्दल कोणतेही आक्षेपार्ह वक्त्य केलेले नाही, असा दावा त्यांनी केला आहे. मात्र आझम खान यांच्याविरोधात सोमवारी महिलेवर हीन पातळीवर टीका केल्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसंच निवडणुक आयोरगाने त्यांच्या शिक्षा म्हणून ७२ तासांसाठी प्रचार करण्यासाठी बंदी घातली आहे.