ट्रोल करणाऱ्या ‘त्या’ युजरला रेणूका शहाणेंनी दिलं असं उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री रेणुका शहाणे या सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. ट्विटरवर आपले मत परखड मत मांडण्यासाठी प्रसिद्ध कलाकारंपैकी एक नाव रेणूका शहाणे यांचं आहे. नुकताच एक किस्सा समोर आला आहे. त्यांना ट्रोल करणाऱ्या एका युजरला रेणूका यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. जे ट्विट करतात त्यांना काही काम नसतं का असा टोलाही रेणूका यांनी त्या युजरला लगावला आहे.

अभय सिंग रातपुत या ट्विटर युजरने रेणूका शहाणे यांना टॅग करत ट्विट केले होते की, “रेणुका जी तुमच्याकडे काही काम नाही का ? आजकाल तुम्ही ट्विटरवर काम करता का” असा प्रश्न युजरने विचारला होता. रेणूका शहाणे यांनी त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. रोणूका शहाणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “तुम्ही असं मानता का की, जे लोक ट्विट करतात त्यांना काहीच काम नसतं ? जे लोक ट्विट करतात, म्हणजेच मोठे उद्योगपती, वैज्ञानिक, राजकीय पक्ष, सामान्य जनता हे लोक काही काम नाही म्हणून ट्विट करत असतात का ? ट्विटर अकाऊंट उघडायचं आणि गप्प बसायचं याला काय अर्थ आहे ? असा खोचक सवाल रेणूका शहाणे यांनी विचारला आहे.

 

Loading...
You might also like